01:00pm | Oct 06, 2022 |
नवी दिल्ली : भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण यावेळी भारतीय संघात १४ खेळाडूच होते. विश्वचषकासाठी एका संघात किमान १५ खेळाडू असावे लागतात, पण भारत मात्र आज १४ खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण भारताचा हा १५ वा खेळाडू नेमका कोण असणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. रोहित शर्माला बुमराच्या जागी १५ सदस्यीय संघात त्याला मोहम्मद शमीलाच संधी द्यायची आहे, असे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे रोहित अजूनही शमी कधी फिट होतो, याकडे लक्ष लावून आहे.
शमीला विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळेल, असे वाटत होते. पण त्याला करोना झाला. त्यानंतर त्याने उपचार घेतले आमि तो विश्रांती करत होता. त्यानंतर शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. सध्या तो अकादमीमध्येच आहे. पण त्याची फिटनेस टेस्ट अजूनही झालेली नाही. शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेका काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
शमीची अजूननही फिटनेस टेस्ट घेण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही टेस्ट होईल आणि त्याचा निकाल जाहीर होईल तेव्हा भारताला १५वा खेळाडू मिळू शकतो. जर शमी फिट असेल तर तो भारताचा १५वा खेळाडू असेल, तर तो फिट नसला तर बुमराच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक १५ वा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. शमीसाठी रोहित आणि द्रविड आग्रही आहेत. त्यामुळेच ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे या टेस्टची उत्सुकता सर्वांनाच असेल.
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |