कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या सेवेमध्ये लवकरच अत्याधुनिक रुग्णवाहिका दाखल होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. सदरची रुग्णवाहिका आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून घेण्यात येणार आहे. यासाठी आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळ सातारा यांना शिफारस करुन त्यास मान्यता मिळालेली आहे.
संपुर्ण भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून याचा परिणाम महाराष्ट्रासह मलकापूर शहरामध्येसुध्दा जाणवु लागला आहे. मलकापूर शहरामध्ये कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून येत असून सदर रुग्णांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मलकापूर शहराची एकूण लोकसंख्या 40000 पेक्षा जास्त असून नगरपरिषदकडे स्वतंत्र दवाखान्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे सर्व आरोग्यविषयक बाबींकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, कालेचे मलकापूर येथील उपकेंद्राव्दारे सुविधा पुरविल्या जात आहेत. तथापि, सध्या या उपकेंद्राकडे केवळ तीनच कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे या सर्व बाबींचा ताण मलकापूर नगरपरिषदेवर पडत आहे. परंतु मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद कर्मचार्यांमार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु ठेवलेल्या आहेत.
सध्या कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून बाधीत रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्यक असल्याने सदर रुग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. सध्या रुग्नवाहिकांवरील ताण विचारात घेता मलकापूर शहरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आवश्यक असल्यामुळे मलकापूर नगरपरिषदेने आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून रक्कम रु. 15 लक्ष निधी रुग्णवाहिका खरेदी करणासाठी मिळणेबाबत विनंती केली होती. त्यानूसार त्यांनी दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा अधिकारी तथा सचिव, जिल्हा नियोजन मंडळ, सातारा यांना रक्कम रु.15 लक्ष निधी रुग्णवाहिकेसाठी मंजूर करण्यासाठी शिफारस केल्यानूसार जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
यामुळे मलकापूर शहरातील कोरोना विषाणूबाधीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी हॉस्पिटमध्ये नेण्यासाठी सोय उपलब्ध होणार आहे. सदरची रुग्णवाहिका दि. 30 ऑगस्ट पुर्वी नगरपरिषदेच्या सेवेत समाविष्ठ होणार आहे.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |