05:07pm | Jul 18, 2020 |
कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कोरेगाव तालुक्यातील तारगाव रेल्वे स्टेशन ते तारगाव रस्त्यासह पुलाच्या कामासाठी 1 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प 2020-21 मधून हा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
तारगाव रेल्वे स्टेशन ते तारगाव हा रस्ता अरुंद असून त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. रहिमतपूर व कराड शहरांकडे येणिया जाण्यासाठी या मार्गाचा वापर नागरिक मोठया प्रमाणात करत असतात. तसेच या मार्गावरून सह्याद्री साखर कारखान्यासाठी ऊस वहातूक मोठया प्रमाणात केली जाते. तारगाव गावाजवळ अरुंद व कमी उंचीचा पूल असून तो पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असते. याशिवाय तारगाव रेल्वे स्टेशन येथे पॅसेंजर गाडया थांबत असल्यामुळे प्रवासी तसेच मालवहातूक करणेसाठी रेल्वे स्टेशनवरती गर्दी होत असते. परिसराच्या गावातील नागरिकांकडून रेल्वे स्टेशनकडे ये-जा करणेसाठी या रस्त्याचा वापर कएसी जातो.
विभागातील रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा असल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, संभाजीराव गायकवाड, शहाजी क्षीरगसागर, कांतीलाल पाटील व विकास थोरात यांनी खा. श्रीनिवास पाटील यांचेकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांनी या रस्त्याची पहाणी करुन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खंडाळा कोरेगाव रहिमतपूर तारगाव मसुर कराड सांगली शिरोळ रस्ता रा.मा.-142 कि.मी 77/00 ते 79/00 (भाग तारगाव रेल्वे स्टेशन ते तारगाव) मधील रस्ता सुधारणा करणे व तारगाव गावाजवळ कि.मी 78/600 मध्ये लहान पूल बांधणे हे काम अर्थसंकल्प 2020 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसे बांधकाम विभागाने पत्राद्वारे कळविले असल्याचे सांगण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |