02:52pm | Jun 13, 2022 |
नवी दिल्ली : देशाचे नवे राष्ट्रपती निवडण्याची औपचारिक प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली असून, राष्ट्रपतीपद निवडणुकीचे मतदान १८ जुलैला होणार आहे. या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा २१ जुलैला जाहीर होणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावांची रविवारी घोषणा केली.
सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो कोणी उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होईल, असे चित्र आहे. त्यामुळेच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती धक्कातंत्राची आहे. यापूर्वी २०१७च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून, त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कोविंद यांना राष्ट्रपतीपदी विजयी करून भाजपने देशभरातील दलित समुदायाला संदेश दिला होता. याशिवाय दलित समुदायातील व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून भाजपने विरोधी पक्षांमध्येही फूट पाडली होती.
सध्या 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू असताना भाजप आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ शकतो, अशी चर्चा आहे. याशिवाय महिलेला उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा धक्कातंत्राचा इतिहास पाहता याबाबत भाकीत करणे कठीण असल्याचे बोलले जाते.
पुढील आठवड्यात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा भाजपकडून केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच भाजप त्या उमेदवाराची घोषणा करणार आहे.
भाजपचा विजयाचा विश्वास
लोकसभेमध्ये ५४० पैकी (तीन जागा रिक्त) भाजपचे ३०१ खासदार आहेत. राज्यसभेत २३२ पैकी (नामनिर्देशित सदस्य वगळता) नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपकडे ९२ खासदार असतील. विविध राज्यांच्या विधानसभा व विधान परिषदांमधील भाजप आमदारांची संख्या २०१७च्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, संसदेतील एनडीएच्या घटक पक्षांचे खासदार, बिगर एनडीए व बिगर यूपीए प्रादेशिक पक्षांचे खासदार यांच्या पाठिंब्याने राष्ट्रपतीपदाची निवडणूक सहज जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे. ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी आशा भाजपला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |