12:59pm | Jul 03, 2021 |
पुसेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुसेगाव पंचक्रोशी व खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील लोकहिताच्या कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी दिली.
पुसेगांव ग्रामपंचायतीस सारंग पाटील यांची आज भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामविकास अधिकारी काझी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव जाधव, मधुकर टिळेकर, सुरेशशेठ जाधव, संतोष तारळकर, विशाल जाधव, गणेश जाधव, सत्यम जाधव, सोहराबभाई शिकलगार, सुरज जाधव, अजय जाधव, संजय जाधव, गणेश मदने उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके व गांवे यांच्या विकास कामांचा आढाव व प्रत्यक्ष प्रस्तावित विकास कामांची पहाणी तसेच अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी मतदारसंघात दौरा सुरु आहे. यावेळी पाटील यांनी पुसेगांव मधील विविध सार्वजनिक प्रश्न, विकास कामे याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपचायत सदस्य यांच्याशी चर्चा केली.
पुसेगांव मधील लोकहिताच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली. गांवातील रस्ते, जुन्या बुधरोड वरील धोकादायक पुल, गोरे वस्ती येथील विद्युत ट्रान्सफार्मर अशा विकासकामांसाठी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाना सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी उत्तर खटाव तालुक्यातील सर्व विकास कामे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही दिली.
सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी विविध विकास कामांची मागणी करणारे निवेदन यावेळी पाटील यांना दिले. या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसेगाव शहरप्रमुख राम जाधव यांनी आभार मानले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |