08:41pm | Jul 29, 2022 |
सातारा : एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढवणे, सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपानाचे प्रमाण वाढविणे व बाळाच्या सहा महिन्यानंतर दोन वर्षापर्यंत बाळाला आईच्या दूधाबरोबर वरचा आहार याचे प्रमाण वाढविणे यासाठी मिशन धाराऊ मातादुग्धामृतम् ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये स्तनपान व शिशुपोषण या विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत मिशन धाराऊ स्तनपान व शिशुपोषण विषयी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युनिसेफचे स्तनपान व शिशुपोषणचे राज्य सल्लागार पांडुरंग सुदामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) रोहिणी ढवळे आणि विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी गौडा म्हणाले, स्तनपान व शिशुपोषण या विषयी लोकचळवळ सर्वत्र व्यापक स्वरुपात होण्यासाठी तालुका स्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदनीस यांच्याद्वारे घरोघरी याची जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात राबवून त्याला मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील सर्व घटकापर्यंत स्तनपान व शिशुपोषणाबाबत शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक गावात धाराऊ सखी पथक तयार करण्यात येणार असून त्याद्वारे गरोदर महिला व स्तनदा माता यांच्या समस्या पण सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी युनिसेफचे स्तनपान व शिशुपोषणचे राज्य सल्लागार पांडुरंग सुदामे यांनी एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाची व त्यामुळे बाळाच्या आरोग्य विषयी होणारे फायदे याचबरोबर स्तनपानासोबत दिला जाणारा पुरक आहार का महत्वाचा आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) रोहिणी ढवळे यांनी मिशन धाराऊ माता दुग्धामृतम् या अभियानाची सखोल माहिती दिली.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |