09:04pm | May 21, 2022 |
सातारा : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सातारा व बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा क्षेत्र यांच्या वतीने आयोजित महाकर्ज वितरण मेळाव्यात मौजे भुईंज, ता. वाई येथे 440 स्वयंसहायता समूहांना एकुण 6 कोटी 53 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सूचनेप्रमाणे सुषमा देसाई प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा. यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 मे रोजी सातारा जिल्ह्यातील उमेद अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या 5 तालुक्यातील शाखा (जावली, वाई, कोरेगाव, खंडाळा व सातारा) मिळून महाकर्ज वितरण (Credit Outreach Program) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आशिष पांडे कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र, विवेक नाचणे क्षेत्रीय प्रबंधक सातारा क्षेत्र, श्रीकृष्ण झेले क्षेत्रीय उपप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा क्षेत्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सातारा मार्फत मनोजकुमार राजे जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सातारा, संजय निकम जिल्हा कार्य व्यवस्थापक (स्मार्ट), सातारा, गोडसे, पोळ जिल्हा उद्योग केंद्र, सातारा. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) चे मुख्य प्रशिक्षक लिनेश निकम, युवराज पाटील जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सातारा, उपस्थित होते.
कार्यक्रमात कवठे तालुका वाई या गावातील माऊली बचत समूहाच्या सदस्य जयश्री संजय कदम (मयत) यांचे वारस मुलगी विजया संजय कदम हिला व कृष्णाई समूहातील सिंधू राजेंद्र जाधव (मयत) यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती या विमा योजनेअंतर्गत रुपये 2 लाख विम्याच्या रकमेचा धनादेश आशिष पांडे कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी नितीराज साबळे जिल्हा आर्थिक साक्षरता सल्लागार बँक ऑफ महाराष्ट्र सातारा, रंजनकुमार वायदंडे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, सातारा. निलेश भोसले जिल्हा व्यवस्थापक, कृतीसंगम (Convergence) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा, श्रीमती पुनम गायकवाड, तालुका अभियान व्यवस्थापक, वाई, प्रविण खुडे तालुका अभियान व्यवस्थापक, खंडाळा, अल्पेश खरात तालुका व्यवस्थापक जावळी, सौरभ फरांदे तालुका व्यवस्थापक, वाई, राजेश चव्हाण तालुका व्यवस्थापक, खंडाळा, (MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम) काशिनाथ कुंभार तालुका व्यवस्थापक, आर्थिक समावेशन, खंडाळा संदीप कांबळे तालुका व्यवस्थापक, आर्थिक समावेशन, कोरेगाव, त्याचप्रमाणे चारही तालुक्यातील प्रभाग समन्वयक श्रीमती संगीता देशमाने, जावळी, श्रीमती दिपाली महामुनी, कोरेगाव. श्रीमती रेश्मा धायगुडे, खंडाळा. श्रीमती माधवी मतकर, कौशल्य समन्वयक, वाई व संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक, उमेद अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती व बँक सखीताई, आर्थिक साक्षरता सखीताई 5 ही तालुक्यातील बचत समूहाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य त्याचप्रमाणे 5 ही तालुक्यातील ग्रामसंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |