04:28pm | Sep 29, 2020 |
पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर छापेमारी करण्यात आली. पुणे शहरातील आमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. भोसले यांच्या घरावर छापेमारी करून त्यांच्या महागड्या कार आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कारची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यांच्याकडील आणखी वाहने जप्त केली जाण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यापूर्वी भोसले आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अनिल भोसले संचालक होते, त्यावेळी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत गैरव्यवहार होण्यास सुरुवात झाली होती. बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. ठेवीदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. भोसले यांनी बँकेतून दोन कोटी रुपये काढले. दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला, त्याचा कोणताही हिशेब नाही. बँक खाते नसताना 80 कोटी रुपयांचा धनादेश त्या खात्याच्या नावावर काढण्यात आला, त्या 80 कोटी रुपयांचा हिशेब नाही. भोसले यांनी 2019 मध्ये जनजागृती संघटनेला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी 1 लाख ठेवीदारांचे 430 कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्यातील एकही रुपया ठेवीदारांना दिला नाही. भोसले हे सामाजिक, राजकीयदृष्ट्या भक्कम असल्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आला होता.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |