12:39pm | Nov 12, 2022 |
दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भातील यादी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित ठेवली आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज मोदी सरकारची खरडपट्टी काढली. कॉलेजियमकडून पाठवण्यात आलेली नावे कोणतेही कारण न देता प्रलंबित ठेवणे अजिबात स्वीकारार्ह नाही, असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. त्याचवेळी केंद्र सरकारला नोटीस बजावत याबाबत स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे. 28 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाठवलेली 11 न्यायाधीशांची नावे केंद्रीय विधी विभागाकडे प्रलंबित आहेत. या यादीवर तातडीने निर्णय घेण्याबाबत नमूद करण्यात आले होते, मात्र केंद्र सरकारकडून ही यादी अद्याप मंजूर करण्यात आलेली नसल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले आहे. याबाबत बंगळुरू येथील वकील संघटनेने याचिका दाखल केली असून न्या. संजय किशन कौल आणि न्या. अभय ओक यांच्या द्विसदस्यीय पीठापुढे यावर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं?
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाठवलेली नावे प्रलंबित ठेवणे, त्याला मंजुरी न देणे आणि ही नावे प्रलंबित का ठेवली, याचे कोणतेच कारण न सांगणे हे केंद्र सरकारचे वागणे अजिबात स्वीकारार्ह नाही, असे द्विसदस्यीय पीठाने सुनावले. दोनवेळा नावे पाठवूनही त्यांना मंजुरी दिली गेली नाही. काही नावांवर पुनर्विचार करण्यास सांगितले गेले. यादरम्यान काहींनी आपले नाव मागे घेतले. हे न्यायालयाचेच नुकसान आहे, असे ताशेरे कोर्टाने ओढले. दुसऱयांदा शिफारस केल्यानंतर तरी नावांना मंजुरी दिलीच गेली पाहिजे. तसे होत नसेल आणि संबंधितांना नावे मागे घेण्यास भाग पाडले जात असेल तर ही बाब गंभीर आहे, असे कोर्टाने नमूद केले.
न्यायदान करणारी व्यक्ती सक्षम असेल तरच न्यायपालिकेची शोभा वाढेल. नाहीतर कायदा आणि न्याय या प्रक्रियेलाही त्याचा फटका बसेल, अशी गंभीर टिपण्णी करतानाच केंद्र सरकारकडून या मंजुरीस विलंब का होतोय हे समजण्यापलीकडे आहे, असेही कोर्टाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाठवलेली 11 न्यायाधीशांची नावे केंद्रीय विधी विभागाकडे प्रलंबित आहेत. या यादीवर तातडीने निर्णय घेण्याबाबत नमूद करण्यात आले होते, मात्र केंद्र सरकारकडून ही यादी अद्याप मंजूर करण्यात आलेली नसल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले आहे. याबाबत बंगळुरू येथील वकील संघटनेने याचिका दाखल केली असून न्या. संजय किशन कौल आणि न्या. अभय ओक यांच्या द्विसदस्यीय पीठापुढे यावर सुनावणी झाली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |