वाई : वनक्षेत्रात वणवा लागण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विंडवर्ल्ड इंडिया पवनचक्की कंपनीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांनी पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम कंपनीमार्फत असिस्टंट इंजिनियर यांनी भरली.
राखीव वनक्षेत्रात वनवणवा लागू नये म्हणून वनविभागामार्फत जनजागृती कार्यक्रम होवून तसेच विविध उपाययोजना करुन देखील लोकांकडून गैरसमजुतीतून तसेच जाणूनबुजून वणवे लावले जातात. दि. 2 मार्च 2019 रोजी मौजे वहागाव. फॉ.क.नं. 38 मधील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याचे दिसून आल्यावर वनकर्मचार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून वणवा विझविला होता. स्थानिक तपासात या वनक्षेत्रात लागलेला वणवा हा विंडवर्ल्ड इंडिया (इनरकॉन) कंपनीच्या विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याचे सिध्द झाले.
विंडवर्ल्ड इंडिया कंपनीमार्फत योग्य त्या उपाययोजना न राबविल्यामुळे 11 हेक्टर वनक्षेत्र जळीत झाल्याचे सिध्द झाले. कंपनीवर वनविभागामार्फत भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26(1)(ब)(फ) चे उल्लंघन झाल्याने वनगुन्हा नोंद करण्यात आला होता.
या वन गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन दि. 08 ऑक्टोबर 2020 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांचे न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. यावेळी न्यायालयाने विंडवर्ल्ड इंडिया पवनचक्की कंपनीस पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कंपनीमार्फत असिस्टंट इंजिनियर यांनी दंडाची रक्कम भरली.
ही कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहा. वनसंरक्षक व्ही.बी. भडाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भुईंज एस. आर. मोरे, वनरक्षक एल. एस. देशमुख, श्रीमती आर. एस. शेख, एस. बी. आडे यांनी पार पाडली.
वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करणेत येते की, राखीव वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, वणवा लावणे, शिकार करणे यांसारखे वनगुन्हे करु नयेत. तसेच वणवा लावल्यामुळे जंगलाच्या निसर्ग संपदेची हानी होवून पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे वणवा लावणे हा अपराध असून तो सिध्द झाल्यास 5 वर्षे कैद किंवा 5 हजार रुपये दंड होवू शकतो.
वनपरिक्षेत्र अधिकारी
वाई.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |