07:40pm | Sep 25, 2022 |
सातारा : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीने पक्षपातीपणा करून पात्र शिक्षकास डावलून कमी गुण असणाऱ्या शिक्षकास आदर्श पुरस्कार जाहीर केला. खटाव तालुक्यातील दोन्ही शिक्षकांच्या प्रस्तावाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी निकषनिहाय गुणांकन केले. या घटनेला १५ दिवस होऊनही अद्याप निकाल जाहीर केला नाही. याबाबत तातडीने निर्णय जाहीर करून फेरगुणांकनात पात्र शिक्षकाची वस्तुनिष्ठ यादी जाहीर करावी, अन्यथा प्राथमिक शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा राजापूर ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने २०२२-२३ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले. प्रत्येक तालुक्यातून गुणांकनाने जादा असलेले दोन शिक्षकांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार खटाव तालुकास्तरीय शिक्षण विभागाने सर्व वस्तुनिष्ठ तपासणी करून विनोद गोडसे (पदवीधर शिक्षक) यांचे ७४ गुण व ज्ञानेश्वर धायगुडे (उपशिक्षक) यांचे ६३ गुण असे दोन प्रस्ताव सादर केले. जिल्हास्तरीय गुणांकन समितीने दोन्ही प्रस्तावाची तपासणी करून श्री. गोडसे यांना ७० गुण, तर ज्ञानेश्वर धायगुडे यांना ७३ गुण दिले. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कमिटीच्या गुणांकनात एवढी मोठी तफावत असताना शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही पडताळणी न करता खटाव तालुक्यातून धायगुडे यांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला.
जिल्हास्तरीय गुणांकन समितीने चुकीचे केले असल्याचे दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. खटावसह जिल्ह्याचे फेर गुणांकन करा आणि खटावमधील दोन्ही प्रस्तावांचे फेर गुणांकन राजापूर ग्रामस्थांच्या समोर करण्याच्या त्यांनी शिक्षणाधिकारी यांना तोंडी सूचना दिल्या. जिल्हास्तरीय गुणांकन समितीने दोन्ही प्रस्तावांचे गुणांकन करताना श्री. गोडसे यांना प्रत्यक्ष गुणांकन कमी केल्याचे निदर्शनास आले, तर श्री. धायगुडे यांना निकषात दिलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त इतर घटकांनाच गुण दिल्याचे आढळले. त्यामुळे पात्र शिक्षकांना पुरस्कार मिळणे अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी राजापूर गावचे माजी सरपंच राजेंद्र घाटगे, नारायण घनवट, नीलेश घनवट, संदीप घनवट, अरुणकुमार घाटगे, रामदास डांगरे आदी उपस्थित होते.
चुकीचे गुणांकन करणाऱ्या समितीची चौकशी होणार का?
जिल्हास्तरीय गुणांकन समितीने खटाव तालुक्यातील दोन्ही प्रस्त्वांचे वस्तुनिष्ठ गुणांकन करणे गरजेचे होते. संबंधित समितीने योग्य गुणांकन करण्याच्या ऐवजी निकषात पात्र असणाऱ्या शिक्षकाला कमी गुण देणे. तर दुसरीकडे तुलनेने कमी गुण असणाऱ्या एका शिक्षकाला निकषात दिलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त इतर घटकांनाच जाणीवपूर्वक गुण दिल्याचे निदर्शनास आले आहे. अशा चुकीच्या पद्धतीने गुणांकन करणाऱ्या सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.विनय गौडा यांनी धाडसी निर्णय घ्यावा
सातारा जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लाभलेला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार व स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळा या स्पर्धा घेतल्या जातात. परंतु या दोन्ही स्पर्धांचे गुणांकन जाहीर केले जात नाही, ही बाब दुर्दैवी आहे. शिक्षणसारख्या पवित्र क्षेत्रात ही पारदर्शकता राहिलेली नाही, अशी जिल्हाभर चर्चा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गौडा यांनी धाडसी निर्णय घेऊन सन २०२२-२३ आलेल्या सर्व प्रस्तावनांचे निकष lनिहाय गुणांकन जाहीर करावे. यामुळे पात्र शिक्षकांना न्याय मिळेल.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |