सातारा : वंचित घटकांच्या हातात झेंडा आहे मात्र आमच्याकडे घर नाही. झेंडा लावायचा कुठे हा प्रश्न असल्यामुळे भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी सातारा येथे शांततेच्या मार्गाने झेंडा रॅली काढणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, सातारा हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. आम्ही वंचित असलो तरी, वंचित घटकांना घरे-दारे नसली तरी ही आमची मातृभूमी आहे. ही आमची भावना असल्यामुळे आम्ही दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांततेच्या मार्गाने झेंडा रॅली काढणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सध्या ज्या ठिकाणी वंचित घटक राहत आहेत, तेथील जागा त्यांच्या नावावर करावी अशी विनंती आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. ७५ वर्षात कोणाला काय मिळाले आणि कोणाला काय मिळाले नाही याचा ताळेबंद मांडण्याची ही वेळ नाही. व्यथा जरूर मांडली पाहिजे, ही आमची मातृभूमी आहे. मात्र ती ही वेळ नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी अशोक जाधव, सचिन वायदंडे, दीपक जाधव उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |