फलटण : मत्स्यशेती ही सध्याच्या काळामध्ये रोजगाराच्या तसेच उद्योगाकतेच्या दृष्टीने नवनवीन संधी उपलब्ध करून देणारा पर्याय आहे. मत्स्यशेतीतील संरचना आपण समजून घेतलीत, तर कमी जागेमध्ये सुद्धा जास्त उत्पन्न घेऊ शकतो. मत्स्यशेती करिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजनांचा वापर करून नक्कीच आपण मत्स्यशेती प्रकल्प चांगल्या पद्धतीने उभारू शकतो, असे मत सांगली जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग व अग्रणी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने "मत्स्यशेतीतील उद्योजकता आणि शासनाच्या विविध योजना" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान ०८ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीकांत वारूंजीकर यांनी आपल्या व्याख्याना दरम्यान मत्स्यशेतीतील संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
मत्स्यशेती करिता कोणती जागा निवडावी, तळे कसे उभारावे, मत्स्य प्रजाती कोणत्या निवडाव्यात, माश्यांचे संगोपन करत असताना कोणती काळजी घ्यावी. त्याच बरोबर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे, या योजनेसाठीची पात्रता काय आहे, ही योजना लागू करावयाची असल्यास अधिकाऱ्यांशी भेटून प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, या संदर्भात सखोल विश्लेषण केले.
व्याख्यानाचे अध्यक्षपद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी भूषवले. व्याख्यानाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मंदार पाटसकर यांनी करून दिला.
या ऑनलाईन व्याख्यानासाठी १०० हुन अधिक विद्यार्थी, शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय दीक्षित, अग्रणी महाविद्यालय योजनेच्या समन्वयक प्रा. सौ.रुक्मिणी भोसले उपस्थित होते. प्रा. सीमा पोळ यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमास प्रा.भीमदेव गिऱ्हे आणि विभागातील प्राध्यापिकांचे सहकार्य लाभले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |