कराड : शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशमधील भामट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याने आतापर्यंत 81 जणांची फसवणूक करून 13 कोटींना गंडा घातला आहे.
हृदया रंजनदास गुप्ता (रा. ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) असे उत्तर प्रदेशमधील या भामट्याचे नाव आहे. याबाबत तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी सांगितले की, हृदया गुप्ता याने कराड येथील अमित आंबेकर व त्यांचे मित्र सचिन वाघमारे यांच्याकडून एकूण 19 लाख 87 हजार 500 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवून घेऊन पळून गेला होता. त्यास दिनांक 27 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत केलेल्या तपासामध्ये संशयित हृदया गुप्ता यांने सातारा, अहमदनगर, बीड व पुणे या जिल्ह्यातील सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करुन ते पैसे ऐषारामासाठी खर्च केल्याचे तपासात निषन्न झाले आहे.
संशयित हृदया गुप्ता हा प्रॉफिट मार्ट, पुणे येथे शेअर मार्केट कंपनीत नोकरीस होता. तेथे नोकरी करत असताना त्याची कंपनीत गुंतवणूक करणार्या वेगवेगळया लोकांशी ओळख करुन घेतली. ओळखीचा फायदा घेवून त्याने कंपनीपेक्षा जास्त फायदा व हमखास प्रति महीना उत्पन्न असे अमिष लोकांना दाखवले. त्याबाबत तसे कागदोपत्री करार करून लोकांना हमी दिली. सुरवातीला विश्वास संपादन करण्यासाठी 5 ते 6 महीने प्रति महीना गुंतवणूकदारांना पैसे मिळत गेले. लोकांचा विश्वास संपादन झाल्याचे लक्षात येताच त्याने मोठ्या रकमेची मागणी केली व जमा झालेली सर्व रक्कम घेवून पोबारा केला.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर करीत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |