गांधीनगरः गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे. विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी होणार असल्याची माहिती गुजरात भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली. गांधीनगरमध्ये ही बैठक होणार आहे.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी ३ वाजता बैठक होत आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय संसदीयक कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पक्षाने निरीक्ष म्हणून पाठवलं आहे. पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघही अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. गुजरातल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही आधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करू, असं अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या तोमर यांनी सांगितलं.
आम्ही आधी गुजरातमधील पक्षाच्या नेत्यांची चर्चा करू. याची माहिती पक्षनेतृत्वाला दिली जाईल. पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असं केंद्रीय मंत्री आणि गुजरातसाठी पाठवण्यात आलेले पक्षाचे निरीक्षक प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
गुजरात विधिमंडळ पक्षाची बैठक आज दुपारी ३ वाजता होणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद जोशी आणि भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांच्या प्रमुख उस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत गुजरातचा नवीन मुख्यमंत्री निवडला जाईल, अशी माहिती गुजरात भाजपचे मुख्य प्रवक्ते यामल व्यास यांनी आज गांधीनगरमध्ये दिली.
नवीन मुख्यमंत्रीपदासाठी प्रक्रिया सुरू झाली असताना आता नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे प्रफुल्ल खोडा पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल खोडा पटेल आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यापैकी एकाची मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं. गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजपकडून शक्तिशाली पटेल समाजाला खुश करण्यासाठी डाव-पेच सुरू आहेत.
कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री? PM मोदी ठरवणार, 'ही' ५ नावं चर्चेत
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि यांच्यासह उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचीही नावं आहे, असं सूत्रांनी सांगितल. मनसुख मांडवीय अलिकडेच केंद्रीय आरोग्यमंत्री झाले आहेत. तर नितीन पटेल गुजरातचे उपमुख्यमंत्री आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |