02:16pm | Apr 05, 2022 |
बारामती : महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. या खेळात आधी पुरुषांचाच सहभाग होता. मात्र आता अनेक महिला देखील सध्या कुस्तीकडे वळत आहेत, सन 1969 पासून महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा भरविण्यात येते. मात्र, यात केवळ पुरूषांचा सहभाग असतो, आता महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. आज याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरच या संदर्भातली घोषणा होईल असे सांगितले.
दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. आज याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. लवकरच या संदर्भातली घोषणा होईल, महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदा महिला कुस्तीगीरांसाठीही संधी उपलब्ध होईल, असे त्या म्हणाल्या आहेत. हरियाणामध्ये कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, महाराष्ट्रामध्येही क्षमता आहे, आपणही ते करायला पाहिजे, असेही सय्यद म्हणाल्या आहेत.
महिला मल्लांसाठी ठरणार क्रांतिकारी घोषणा
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. या खेळात आधी पुरुषांचाच सहभाग होता. मात्र, आता महाराष्ट्रातही अनेक मुली सध्या कुस्तीकडे वळत आहेत. अनेक महिला मल्ल अनेक स्पर्धा खेळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यात येते. मात्र यात केवळ पुरूषांचा सहभाग असून कुस्तीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोठी घोषणाही केली होती. ही घोषणा महिला मल्लांसाठी क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे.
तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला मान
आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगत आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |