02:45pm | Mar 06, 2021 |
पुसेगाव : पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त करण्यात कोरेगाव व पुसेगाव पोलिसांना यश आले आहे.
याबाबत माहिती अशी, कोरेगाव ते पुसेगाव रोडवर अवैध गुटखा व पानमसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशिर माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक अजय बन्सल यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलिस अधिक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. एम. मोरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम, सहायक फौजदार पाटोळे, हवालदार झारी व वाघमळे यांना रात्री साडे नऊच्या दरम्यान कुमठे फाटा येथे बिना नंबर प्लेटच्या आढळून आलेल्या मोटार सायकलमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व तंबाखू असा 94 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत या मोटारसायकलचा चालक जमील शफिक बागवान राहणार कळकाई गल्ली कोरेगाव याच्यावर अन्न सुरक्षा अधिकारी युवराज तात्याबा ढेंबरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुसेगाव येथेही अवैध गुटखा, पान मसला,सुगंधी सुपारी व तंबाखूचा अवैधसाठा असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोंढे व हवालदार मुल्ला यांनी येथील सचिन ज्वेलर्स शेजारील सलून दुकानात अचानक छापा टाकला असता या ठिकाणी एक लाख 98 हजार 632 रुपये किंमतीचा तंबाखू, गुटखा, आर.एम.डी पानमसाला, गोल्ड सेंटेड तंबाखुचा साठा आढळून आला. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता गणपत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिध्दार्थ संजय भिसे, (रा. निढळ, ता. खटाव) व आनंदा रामचंद्र चव्हाण (रा. नेर, ता. खटाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |