सातारा : मराठा आरक्षणा संदर्भात आज कोल्हापुरात बिगुल वाजले. आजचे आंदोलन हे पहिल्या टप्प्यातील आंदोलन असून जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. समाज बोलला, आम्ही बोलतो आता लोकप्रतिनिधींनी बोलावे आणि आरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी साद खासदार संभाजीराजे यांनी आज घातल्यानंतर मराठा समाजाच्या एल्गार आंदोलनास सातारा मराठा समाजाने पाठिंबा दर्शवला आहे.
याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सातारकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने या समाजातील मुले आज मागे पडले आहेत. मराठा आरक्षण मिळावे, या संदर्भात आज अनेक जण आंदोलन करीत आहेत. खासदार संभाजीराजे हे खरोखरच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातारा वासियांकडून त्यांना शुभेच्छा. विदर्भ, मराठवाडा येथे शेतकरी जशा आत्महत्या करतात, तशाच प्रकारे आत्महत्या मराठा समाजाच्या पाहायला मिळतील. केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार न घेतल्यास हा समाज कायम दारिद्र्यात राहील. त्यामुळे केंद्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमचा मुक आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने मराठ्यांच्या भावनांचा खेळ मांडला आहे असा आरोप करून सातारकर म्हणाले, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती संभाजीराजे हे गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी वेळ मागत होते. मात्र कोरोनाची कारणे सांगून त्यांना भेट देण्यात आली नाही. त्याच वेळी पंतप्रधानांना पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार करण्याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. वास्तविक पाहता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्र खूप अपेक्षेने पाहत आहे. केंद्राने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात अधिवेशन बोलवावे. जम्मू-काश्मीरमध्ये ३०७ कलम हटवण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार केंद्राने मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात घ्यावा, असा सूर अनेक सातारकरांनी आळवला.
मूक आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आक्रमक झालेली एक युवती म्हणाली, मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात गेल्यावेळी अनेक मूक मोर्चे , आंदोलने, आत्महत्याही झाल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. आज कोल्हापूर येथील मूक आंदोलनाबाबतही तसेच होऊ नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातील प्रश्न सोडवावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |