सातारा : विंग, ता. कराड येथील शेतामध्ये ऊस तोडत असताना मजुरांना आढळून आलेल्या आढळलेल्या बिबट्याच्या तीनही पिल्लांना बिबट्या मादीने रात्री 9.30 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान सुखरूपपणे उचलून आपल्या अधिवासाकडे नेले. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्यांनी नि:श्वास सोडला. दरम्यान या परिसरात बिबट्याची भीती अद्याप कायम असून रात्री अपरात्री उसाला पाणी द्यायला जाण्यासाठी शेतकरी घाबरत असून त्यांच्याकडून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, विंग, ता. कराड येथील येथील कानिफनाथ मंदिर परिसरात तानाजी नाना खबाले यांचे शेत आहे. काल त्याठिकाणी ऊसतोडणी सुरू होती. तोडणी अर्ध्यावर गेल्यानंतर एका सरीत बिबट्याची तीन पिल्ले निदर्शनास आली. पिल्ले बिबट्याची असल्याने मजूरांत भिती निर्माण झाली. त्यानीच अन्य शेतकर्यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाला पाचारण केले. वनविभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पिल्लाना ताब्यात घेतले. बिबट्या मादी व पिल्लाचे मिलन घडवून अणण्यासाठी वनविभागाने सापळा रचला. सायंकाळी उशिरा तिन्ही पिल्ले प्लास्टीकच्या बकेटमध्ये त्यासाठी ठेवली. सीसीटीव्ही कॅमेरे लावले. रात्री 9.30 ते 12 च्या दरम्यान पिल्लाना मादीने ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटे एका पिल्लाला तिने उचलले. नैसर्गिक अधिवासात पिल्लाना ती घेऊन गेली. कर्मचार्यांनी त्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला.
सातारा सहाय्यक वनसरंक्षक महेश झाजुर्णे, कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक उत्तम पाढंरे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, मानद वनजीवरक्षक रोहन भाटे, वनसमिती अध्यक्ष तानाजी खबाले, वनसेवक भरत पवार, अमोल माने, सोसायटी लिपीक शंकर खबाले यांनी बीबट्या मादी अणि पिल्लाचे मिलन घडवून अणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. तिन्ही पिल्ले दीड-दोन महिन्याची आहेत, असे वनविभागाने माहिती देताना सांगितले. त्या वस्ती परिसरातील ग्रामस्थांत बिबट्याची भिती मात्र कायम आहे. रात्री-अपरात्री ऊसाला पाणी द्यायला शेतकरी घाबरत आहेत. बंदोबस्ताची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |