08:31pm | Jan 19, 2023 |
सातारा : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या ललगुण, ता. खटाव येथील घरावर हॉटेल व्यवसायिक व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबियांनी हल्ला करून चारचाकी वाहनासह चिकन सेंटरची तोडफोड केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
मिळालेली माहिती अशी, ललगुण, ता. खटाव येथील गुरुकृपा हॉटेल लॉजवर बेकायदेशीर दारू विक्री सह गैरप्रकार चालत असल्याने ते बंद व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष मुमताज मुलाणी यांनी वारंवार पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून गुरुकृपा हॉटेल व लॉज चे मालक बाळासाहेब माने, अजित माने, संभाजी माने, इंदुबाई माने, मेघा माने, मयूर माने यांच्यासह सुमारे दहा जणांनी दि. १८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुमताज मुलाणी यांना अश्लील व लज्जास्पद शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरासमोर उभे राहून घर व कार क्रमांक एम.एच. १२ एचझेड १९२७सह चिकन सेंटरची तोडफोड केली. चिकन सेंटरमधील साहित्याची मोडतोड करून ते इतरत्र फेकून दिले. याबाबत मुमताज मुलाणी व त्यांचे पती निवृत्त पोलीस अधिकारी हुसेन गुलाब मुलाणी यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेतील सर्व हल्लेखोर फरार झाले आहेत.
मी शांत बसणार नाही : मुमताज मुलाणी
अनधिकृत व्यावसायांच्या विरोधात आवाज उठवणे, हा गुन्हा आहे का असा प्रश्न उपस्थित करत एका निवृत्त पोलीस अधिकाराच्या घरावर हल्ला होऊ नये पोलीस प्रशासन अद्यापही बग्याच्या भूमिकेत आहे. वारंवार तक्रार देऊनही अनधिकृत व्यवसाय बंद झाले नाहीत. आज माझ्या घरावर भ्याड हल्ला केला असला तरी मी शांत बसणार नाही. ललगुण व परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रीच्या विरोधात भविष्यातही लढा आणखी तीव्र करणार आहे, अशी प्रतिक्रिया मुमताज मुलाणी यांनी दिली.पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी : आ. शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मुमताज मुलाणी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष आणि मी खंबीरपणे उभा असून हल्ला प्रकरणी पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |