सातारा: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फलटण बस स्थानकात पहाटेच्या सुमारास 50 वर्षीय महिलेचा खून झाला आहे. याप्रकरणी संशयितास ताब्यात घेतले असून अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषी माता नगर, मलटण, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि.2 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास फलटण बस स्थानकात एका 50 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर बस स्थानकाजवळील रिक्षा चालक व नागरिकांनी संशयितास पकडले. फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून ही जखम फरशीवर पडल्यामुळे अथवा लोखंडी वस्तू ने डोक्यावर प्रहार केल्यामुळे झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेची फिर्याद राज्य परिवहन महामंडळाचे सुरक्षारक्षक दत्तात्रय बबन सोनवलकर (वय 55, रा.दुधेबावी ता.फलटण) यांनी दिली आहे. त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |