प्रकाश राजेघाटगे
बुध : या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या...
खूप जुनं गाणं आहे हे पण आजही नुसत ऐकलं तरी त्यातील आशय,उद्विग्नता आणि मारलेली आर्त हाक मनाला खोलवर चरचर कापत जाते. घर बनतं ते माणसांनी. माया, प्रेम, आपुलकी या धाग्यांनी हळूवारपणे विणून प्रत्येकजण आपल घरटं विणत असतो, सजवत असतो. घर लहान असो की मोठं त्याला किंमत नाही तर किंमत असते ती त्या घरट्यात राहणाऱ्या माणसांच्या एकोप्याला. यातील एक जरी खांब निखळला तरी घर कोलमडून जातं आणि म्हणूनच घरातील प्रत्येक सदस्य लहान असो की मोठा तो महत्वाचा असतो.
पण कधी कधी सभोवतालचं प्रवाही जग, पैसा, पद, प्रतिष्ठा, भौतिक सुविधा आणि मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, कॉम्प्युटर असं आभासी तंत्रज्ञान या सगळ्या जाळ्यात आपण गुरफटत जातो आणि खरी नाती हरवून बसतो. घरातल्या घरातही फोन वरून संवाद करणारे अनेक महाभाग मी बघितलेत. पण नात्यांची खरी किंमत कळते ती ही नाती तुटल्यावर. घरातील एखादा खांब निखळल्यावर. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. हताश होण्याखेरिज आपल्या हाती तेव्हा काहीही उरत नाही.
हे सगळं सांगण्याची आज गरज आहे. कारण गेले वर्ष- दीड वर्ष आपण कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा सामना करतोय. अगदी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतक्या सहजपणे आपल्या जवळची, नात्यातील, ओळखीची कितीतरी माणसं आपण वर्षभरात गमावली. अनेक हसरे चेहरे बघता-बघता आपल्यातून निघून गेले. काही क्षणापुर्वी भेटलेली माणसं या काळानं अगदी तासाभराच्या अंतरात आपल्यापासून हिरावून नेली. कित्येकांच्या भेटी अधुऱ्या राहिल्या, कित्येकांच बोलण अधुर राहिलं, कित्येक ठिकाणी घरातील लग्न, बारस, गृहप्रवेश असे घरगुती समारंभ बघण्याआधीच माणसं निघून गेली. कुठंतरी, कुणीतरी कुणासाठी भेट देण्यासाठी काहीतरी आणलं होतं. पण भेट होण्याआधीच ती माणसंच निघून गेली. बोलायचं राहिलं, भेटायचं राहिलं, जवळ कुशीत जाऊन रडायचं राहिलं, मनातलं व्यक्त व्हायचं राहील, माहेरपण राहिलं, कुठं लेकीचं कौतुक करायचं राहिलं, हे आणि आणखी बरंच काही करायचं राहुन गेलं आणि माणस मात्र पाखरांसारखी उडून गेली.
कित्येकांशी वर्षानुवर्षे अबोला होता. कुणी आधी बोलायचं. मी का म्हणून आधी बोलायचं या इगोपायी कायमचा अबोला धरून माणसं निघून गेली. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, जिवलग, शेजारी यातील कितीतरी माणसं आपण सहज तोडून टाकली. कित्येकांनी तर रागाने अनेकांना ब्लॉक केलं. पण असं बाहेरून ब्लॉक करण्याने ती माणस मनातून कधीच ब्लॉक झाली नाहीत आणि जेव्हा हा ब्लॉक काढावा म्हणलं, संवादासाठी रस्ता रिकामा केला तेव्हा समजलं, आपण ब्लॉक काढण्या आधीच ती माणस जगातून ब्लॉक झाली.
माफी मागायची राहून गेली, माफ करायचं राहून गेलं. अडचणीत एखाद्याला धीर द्यायचा राहून गेला. झालं गेलं विसरून पुन्हा नव्याने जगायचं राहून गेलं. हे आणि संवादाचे असे कितीतरी क्षण असेच अधुरे राहिले आणि माणसं मात्र दूर देशीच्या प्रवासाला निघून गेली.
उद्या भेटायला येईन असं वचन देऊन परत निघालेली माणसं उद्याचा दिवस न बघताच निघून गेली. हे सगळं पाहिलं, अनुभवलं की वाटतं माणूस म्हणून जन्माला येऊनही आपण काय कमावलं? माणसाच्या नात्याला आपण खरंच न्याय देऊ शकलो? आपल्या जवळच्या माणसांना आपण काय दिलं? काहीच देऊ शकलो नाही. आणि आता जरी द्यावस वाटलं तरी देऊ शकत नाही. कारण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी गेलेल्या माणसांना जिवंत करण्याचं तंत्रज्ञान आजही आपल्याकडे उपलब्ध नाही.
व्हॉट्स अप, फेसबुक या आभासी दुनियेतील संवाद क्षणभराचा आहे. तरी ही या आभासी दुनियेत आपण रमलो. नात्यातले, जिवाभावाचे सोबती विसरलो, आता जाग आली, पण खूप उशीर झाला. पण जेव्हा चूक समजली तेव्हा मुखातून सहजच शब्द उमटले..
या चिमण्यांनो परत फिरा रे... पण व्यर्थ. ना ती माणसं परत आली, ना त्यांच्याशी करायचा तो संवाद तो करता आला.
सगळं मनातल्या मनात राहून गेलं आणि उरला तो फक्त आभासी दुनियेतील मुखवट्याआडचा रात्रीचा आभासी आणि संवेदनाहीन संवाद. या आभासी दुनियेतून प्रत्येकाने बाहेर पडावं. आपल्या आजुबाजूच जिवंत माणसांनी भरलेलं जग आहे त्या जगाशी खुल्या मनाने संवाद करावा म्हणजे पुन्हा आयुष्यात कधीच कुणाचा संवाद अधुरा राहणार नाही आणि कुणालाच पुन्हा या चिमण्यांनो परत फिरा रे... असं म्हणण्याची वेळ येणार नाही.
या लेखाच्या निमित्ताने घराघरातील हरवलेले संवाद पुन्हा नव्याने सुरू व्हावेत. प्रत्येक घर हसर गोकुळ व्हाव आणि या चिमण्यांनो परत फिरा रे... ही आर्त हाक मारण्याची कुणालाही गरज भासू नये, इतकीच माफक अपेक्षा.
संकलन : सौ. आराधना गुरव
वडूज, सातारा.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |