फलटण : दारू पिण्यास पैसे देत नसल्याने फलटण तालुक्यातील बरड येथील एकाचा लाकडी दांडक्याने आणि फरशी, विटेच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि.१८ रोजी बरड ता. फलटण येथे पालखी तळावर दुपारी साडे चारच्या सुमारास महादेव मंदिराजवळ सागर पोपट लोंढे व सावकार नामदेव लोंढे रा. बरड या दोघांनी दारू पिण्यास पैसे देत नसल्याबद्दल बाळु नामदेव गावडे रा. बरड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यावर सागर व सावकार याने बाळू गावडे यांच्या डोक्यात लाकडी दांडके, वीट व फरशीचे तुकडे फेकून बाळू गावडे यांना गंभीर जखमी केले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाळू गावडे यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी यामधील संशयित सागर पोपट लोंढे यास ताब्यात घेतले असून, सावकार नामदेव लोंढे हा घटना घडल्यानंतर फरार झाला आहे . संशयित दोघांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |