01:27pm | Dec 31, 2020 |
बुध: काटकसरी व पारदर्शक कारभारामुळे अल्पावधीत सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या राष्ट्रभाषानुरागी शिक्षक शिक्षकेतर सेवक सह.पतसंस्थेने तपपूर्तीनिमित्त नववर्षाची भेट म्हणून कर्जावरील व्याज दर दहा टक्के व ठेवीवर विक्रमी साडेनऊ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक ता.का.सूर्यवंशी व चेअरमन सुधाकर माने यांनी दिली.
राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेने कायमस्वरूपी सभासदांचे हित लक्षात घेऊनच पारदर्शक कारभार करीत तपपूर्ती केली आहे. अल्प कालावधीत जिल्ह्यात अग्रगण्य व आदर्श पतसंस्था म्हणून नावलौकिक कमविला आहे. कर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने कमी करून कर्जदार सभासदांचे हित जोपासले आहे तर ठेवीवर विक्रमी पावने दहा टक्के व्याजदर देत ठेवीदार सभासदांच्या लाभाचाही विचार केला आहे.
पतसंस्थेचे संस्थापक ता.का.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. कोविडच्या काळातही पतसंस्थेने कर्जवाटप व ठेवींमध्ये आश्वासक प्रगती कायम ठेवली आहे. पतसंस्थेच्या कारभार्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 1 जानेवारीपासून दहा लाखांपर्यंतच्या कर्जाला दहा टक्के तर दहा लाखाच्या पुढे वीस लाखांपर्यंतच्या कर्जाला साडेदहा टक्के व्याजदर राहील. ठेवीसाठी विक्रमी साडेनऊ टक्के व ज्येष्ठ सभासदांच्या ठेवीला पावणे दहा टक्के असा व्याजदर दिला जाणार आहे. कर्ज व्याज व ठेव व्याज यामध्ये अर्धा टक्क्याचे अल्प मार्जिन ठेवून केवळ सभासद हित पाहणारी पतसंस्था म्हणून राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेने आपला आदर्श निर्माण केला आहे. पतसंस्थेने कोविडच्या काळात मयत झालेल्या 10 सभासदांच्या वारसांना सभासद कल्याण निधीतून प्रत्येकी 25 हजाराची मदत केली आहे. कोविडसाठी मुख्यमंत्री निधीस 51 हजाराचा निधी देवून संस्थेने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. गुणवंत पाल्य व गुणवंत सभासदांचा गुणगौरवही पतसंस्थेमार्फत केला जातो.
कर्ज व्याजदर कपातीचा तसेच ठेवीवरील विक्रमी व्याजदराचा लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहन पतसंस्थेचे व्यवस्थापक नवनाथ शिंदे यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |