10:54pm | Sep 26, 2022 |
सातारा : भेकवली, ता. महाबळेश्वर येथील नरभक्षक बिबट्या (वन विभागाचा एक कर्मचारी) काही महिन्यांपूर्वीच परळी खोऱ्यात रुजू झाला असून परळी खोऱ्यातील नागरिकांचा अंदाज घेत-घेत तो आता आपले नाना 'रंग' उधाळू लागला आहे. गस्तीच्या नावाखाली तोडपाणीवर भर देणारा हा बिबट्या जंगली बिबट्या पेक्षाही अधिक भयानक असल्याचे वास्तव्य समोर येत असून आपण कोणाला काही मागत नाही... कोणी काही दिले तर ते सोडत नाही, अशी मुक्तामुळे वन विभागाच्या कार्यालयातच उधळू लागला आहे. मालदेव येथे धनगर समाज बांधवांसाठी बांधण्यात येणारी स्मशानभूमी उधळून लावण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या या बिबट्याच्या विरोधात कोणी बातम्या दिल्याच तर म्हणे ते पत्रकार त्याच्या डोक्यात बसतात. इतकी खरोखरच्या बिबट्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधित वन विभागाचा कर्मचारी करीत असून अधिकाऱ्यांनी त्याला वेळीच वठणीवर आणावा. नाहीतर आम्ही त्याला नागवे केल्याशिवाय राहणार नाही.
सातारा तालुक्यातील परळी खोरे नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. एकीकडे उरमोडीचे विशाल धरण, तर दुसरीकडे मुबलक जंगल. या खोऱ्यातील लोक अत्यंत प्रामाणिकपणे काबाडकष्ट करून आपल्या आयुष्याची गुजराण करतात. परळी खोऱ्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे परळी येथे वन विभागाचे एक छोटेसे कार्यालय आहे. परळी बीटसाठी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एक नरभक्षक बिबट्या (कर्मचारी) महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली येथील थंड हवा खाऊन काही महिन्यांपूर्वी परळी बीटमध्ये दाखल झाला आहे. परळी बीटमध्ये येताच त्याने ठोसेघर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात बिबट्याच्या थाटातच प्रवेश केला. समितीची माहिती घेतल्यानंतर येथे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? समितीची कामे कोण करते? येथे कोण कोण पत्रकार येते? अशी अक्कल पाजळवण्यास सुरुवात केली. अर्थात ते त्याचे काम असले तरी शब्दांमधून मात्र दादागिरी ऊतू जात होती.
ठोसेघर ग्रामपंचायत हद्दीत मालदेव नावाची वस्ती आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव राहतात. या वस्तीसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे वस्तीपासून काही अंतरावर एका ओढ्यानजीक धनगर समाज बांधवांसाठी स्मशानभुमी बांधण्याचे काम सुरू होते. याबाबतची माहिती मिळताच हा बहाद्दर त्या ठिकाणी पोहचला. ही वनविभागाची जागा असून त्या ठिकाणी बांधकाम करता येणार नसल्याचे सांगत त्याने काम बंद पाडले. ते काम आजही बंद आहे. संबंधित कामाचे फोटो काढून, कागदपत्रे बनवून त्याने आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर केली. मुळात स्मशानभूमीसारख्या कामाला आडवे पडून त्याने काय पुरुषार्थ साधला, हा प्रश्न असला तरी धनगर समाज बांधवांमध्ये मात्र त्याच्या या कृतीबद्दल संतापाची लाट निर्माण झाली आहे.
पेट्रोलसाठी भिकेचे डोहाळे
परळी बिटाचा विस्तार फार मोठा आहे, हे खरे असले तरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी नाहीत. ते वेळेवरही होतात. काही महिन्यापूर्वी परळी बीटातील एका संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या घरी हे महाशय गेले. अनौपचारिक गप्पा झाल्यानंतर आम्हाला पठारावर खूप फिरावे लागते. त्यामुळे समितीकडून पेट्रोलसाठी प्रति महिना पाच हजार रुपये मिळावेत, अशी मागणी त्याने खाजगीत केल्याची खुमासदार चर्चा ठोसेघर परिसरात झडत आहे.
...तर सोडत नाही !
संबंधित कर्मचारी आपण एक थोर विचारवंत असल्यासारखे भासवतो. आपल्याकडे किती तांत्रिक कौशल्य आहे, याचा तो सातत्याने पाढा वाचतो. आपण कोणाला काही मागत नाही. कसलीच अपेक्षा नाही. मात्र कोणी 'काही' दिले तर ते सोडत नाही, अशी भीमगर्जना करण्यासही तो विसरत नाही.
कवडीचे काम नाही दमडीची अपेक्षा
संबंधित कर्मचारी परळी बीट येथे येऊन आठ महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मुळात परळी बिटामध्ये अनेक संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मोठी ठोसेघर समिती मानली जाते. सर्वच समित्यांमध्ये नानाविध संकल्पना राबवून जिल्ह्याला एक आदर्श घालून देण्याची संधी याठिकाणी उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वीच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. हा इतिहास असताना हा बहाद्दर मी याव करीन, मी त्याव करीन, अशी मुक्ताफळे उधळत पठारावर फिरत आहे. कासच्या धर्तीवर ठोसेघर येथील पठारावर अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर फुले उमलली आहेत. या पठाराकडे पर्यटकांना आकर्षित करणे फार गरजेचे आहे. असे असताना त्या दुर्लक्षित फुलांच्या पठाराकडे पाठ फिरवत उलट हा नरभक्षी बिबट्या तोडपाणीवरच अधिक लक्ष ठेवून असतो, अशी चर्चा पठार विभागात सुरू आहे. थोडक्यात कवडीचे काम नाही दमडीची मात्र अपेक्षा, अशी अवस्था त्याची झाली असल्याचे दिसून येते.
शिकारींकडे साफ दुर्लक्ष
परळी खोऱ्यामध्ये घनदाट जंगल आहे. साहजिकच रानडुक्कर, सांबर, भेकर, घोरपड यांचा वावर येथे फार मोठ्या प्रमाणावर असतो. केवळ अतिदुर्गम भागातच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावानजीकच्या जंगलात शिकारीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबत सातत्याने चर्चा होत असतात. मात्र या कर्मचाऱ्याला त्याचा थांगपत्ताच लागत नाही. गेल्या आठ महिन्यांमध्ये त्याला एकही शिकारीची अथवा वृक्षतोडीची घटना उघडकीस आणता आली नाही, यावरून तो किती कार्यक्षम आहे, हेच सिद्ध होत आहे.
सू्र्यावर थुंकण्याचे धाडस महागात पडणार !
काही दिवसांपूर्वीच ठोसेघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या एका वस्तीशेजारील ओढ्याकडेला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका श्वानावर हल्ला केल्याने त्यामध्ये ते जखमी झाले होते. त्यामुळे काही काळ त्या वस्तीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या वस्तीतील एका सुज्ञ युवकाने सातारा येथील वन विभागाला याबाबतची माहिती दिली होती. मात्र वन विभागाने सकाळी कर्मचारी पाठवून देतो, असे सांगून वेळ मारून नेहली होती. या संपूर्ण घटनाक्रमाची बातमी व छायाचित्र केवळ 'सातारा टुडे'मध्ये प्रसिद्ध झाले होते. ती बातमी वाचून त्या कर्मचाऱ्यांचे पित्त चांगलेच खवळले. दुसऱ्या दिवशी सकाळी बिबट्या आला त्या वस्तीमध्ये तो आपल्या एक सहकारी व वनरक्षकासह दाखल झाला. त्या ठिकाणी नागरिकांना धीर देण्याची गरज असताना सर्वप्रथम काल रात्री येथे कोण पत्रकार आले होते का? असा प्रश्न नागरिकांना त्याने विचारला. तेथील सोपस्कार उरकून शेजारीच असणाऱ्या एका वन समितीच्या कार्यालयात तो दाखल झाला. तिथेही त्याने थयथयाट केला. आमच्या विरोधात बातमी छापून आली म्हणून काही फरक पडत नाही. बातमी देणारा पत्रकार मात्र कायम आमच्या डोक्यात राहतो, अशी मुक्ताफळे त्याने उधळत एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचे धाडस केले आहे. प्रसिद्धीमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जातात. कदाचित त्याला त्याच्या आई-वडिलांनी शिकवले नसेल. आजपर्यंत प्रसिद्धी माध्यमांच्या नादाला लागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काय हाल झाले, याचा या कर्मचाऱ्याने अभ्यास करण्याची गरज आहे. अंगात गरम रक्त आहे म्हणून परळी खोऱ्यात वर्दीआड कोणी काहीही बरळेल, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांचे सातबारे आम्ही जाहीररित्या प्रसिद्ध करू.
मोहिते साहेब, त्या कर्मचाऱ्याला माळढोकला पाठवा
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात माळढोक नावाचे बिबट निवारण केंद्र आहे. या ठिकाणी हिंस्र झालेल्या, जखमी झालेल्या, वय झालेल्या, आजारी असलेल्या आणि स्मृतीभंक्ष झालेल्या बिबट्यांवर उपचार करण्यात येतात. हा वाचाळवीर कर्मचारी भविष्यामध्ये वन विभागाला धोका ठरू शकतो. प्रसिद्धी माध्यमांनाच अंगावर घेण्याची सातत्याने तो मस्ती करत असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या वन विभागाचे प्रमुख महादेव मोहिते यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अशा कर्मचाऱ्यांना जुन्नर तालुक्यातील माळढोक येथील बिबट निवारण केंद्रात पाठवून त्याला सुबुद्धी येवो, अशी प्रार्थना करावी वाटते. अन्यथा वारंवार त्याचे कपडे काढण्यास आम्ही तयार आहोतच.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |