09:53pm | Jan 12, 2022 |
फलटण : शहरातील गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये एकाचा निर्घृण खून करण्यात आला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. फलटण शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे मात्र फलटणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडल्यामुळे फलटणमध्ये पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारी बोकाळती की काय, अशी भीती फलटण शहरात व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवार दि. 12 रोजी फलटण शहरात असलेल्या शंकर मार्केट परिसरामध्ये फलटण पालिकेचा माजी नगरसेवक तथा या खून प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख (वस्ताद), त्याचा मुलगा सैफुल्ला सलीम शेख, जमीर सलीम शेख, शुभम जाधव, नवाज तांबोळी, बिल्ला शेख, शिर्के (पूर्ण नाव माहित नाही), राज खरात व इतर 5 संशयितांनी मिळून विलास (मछली) भोई व भारत लक्ष्मण फडतरे हे शंकर मार्केट परिसरात उभे असताना त्यांच्यावर जुन्या भांडणाची खुन्नस काढून तीक्ष्ण हत्याराने तसेच गजाने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी क्रूर होती की, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनाही ही मारहाण बघवत नव्हती. रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. काही मिनिटे चाललेल्या या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी विलास उर्फ मछली भोई याला मयत घोषित करण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या फडतरे याला अधिक उपचारासाठी बारामती येथे हलविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सलीम शेख (वस्ताद) व त्याचा दिवटा सैफुल्ला शेख यांची दहशत फलटण शहरात अनेक दिवसांपासून आहे. परंतू पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने या बाप-लेकांची खून करण्यापर्यंत मजल पोहोचली.
काही वर्षांपूर्वी तिकिट न दिल्याच्या रागातून सलीम शेख याने फलटणमधील राजकीय पुढार्यासमोरच एकावर सत्तुराने खुनी हल्ला केला होता. त्याच खुनी हल्ल्याची पुन्हा एकदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर उजळणी झालेली आहे. दरम्यान, मर्डर व हाफ मर्डर झालेल्या या घटनेला आठ तास उलटूनही फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती मिळत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |