सातारा : लॉकडाउन काळातील घरगुती, व्यावसायिक व शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की कोरोनासारख्या महामार्गामुळे सगळ जग हादरून गेले आहे. दि.२२ मार्च पासून सातारा जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन करण्यात आला होता. पर्यायाने दुकाने, रोजगार बंद झाले पैसे मिळण्याचे साधनच संपुष्टात आले. रोजच्या जगण्यासाठी व अन्य करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे ओझे वाढत गेले. वीज बिले माफ करावीत या बाबत दि.१० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विज बिल होळी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळात गैरफायदा घेऊन विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे, तरीसुद्धा त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ग्राहक हित कायदा मुद्दलाच्या २० टक्के इतर कर लावण्यासाठी परवानगी देतो. मात्र वीज वितरण कंपनीने पाठवलेले दिले पाहता ग्राहक हित कायद्याचा भंग होत असून मुद्दलाच्या दुपटीने इतर वेगळे कर लावून ग्राहकांची लूट केली जात आहे, ती तात्काळ थांबविण्यात यावी.
गेली अनेक वर्ष शेतीपंपाच्या बाबतीत रीडिंग तपासणीकरिता अथवा वसुली करिता सातारा जिल्ह्यामध्ये कोणती एजन्सी अस्तित्वात नाही. मात्र मोघम, अंदाजपंचे खोटी बिले तयार करून त्याचे वितरण करून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंपाची बिले गेली अनेक वर्ष भरलेली नाहीत, त्यावरही तातडीने निर्णय घेऊन ही बिले माफ करण्यात यावी. लॉकडाउन काळातील व्यावसायिक ग्राहकांचा स्थिर आकार सुरुवातीला दिला गेला नव्हता. मात्र आता असे दिसून आले आहे, की तो एकत्रित चालू बिलामध्ये समायोजन नावाखाली दिला जात आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट केली जात आहे, ती त्वरित थांबवण्यात यावी. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी स्वाभिमानी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
राजू शेळके, रमेश पिसाळ, अर्जुनराव साळुंखे, संजय जाधव, हणमंत जाधव, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, हेमंत खरात, जनार्दन आवारे, सतीश कदम, मनोहर येवले, राजेंद्र घाडगे, उमेश घाडगे यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |