02:27pm | Nov 29, 2020 |
सातारा : सातार्यातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटचे काम सुरु आहे. बांधकाम विभागाकडून ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु आहे. केवळ आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही तर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी तत्काळ खुला करा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.
पोवई नाका हे शहराचे मुख्य ठिकाण आहे. याठिकाणीच गेल्या अनके दिवसांपासून बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. सध्या ग्रेड सेपरेटरचे काम पुर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. लॉकडाऊननंतर सद्यपरिस्थितीत सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. राजवाडा- पोवई नाका ते मध्यवर्ती बस स्थानक, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झाले आहे. पोवई नाका ते वायसी कॉलेज या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झालेले रस्ते वाहतूकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सध्या सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतूकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची चर्चा सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी खुला कधी होणार? याची उत्सुकता सातारकरांमध्ये आहे. ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक आज सुरु होईल, उद्या सुरु होईल अशा चर्चा अनेकदा झाल्या. आपल्या सातार्यात ग्रेड सेपरेटर आहे हेच सातारकर विसरतील, अशी अवस्था आता झाली आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर तातडीने वाहतुकीसाठी खुला केला पाहिजे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सुचना केल्या. पुर्णत्वास गेलेल्या मार्गावरुन ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक तत्काळ सुरु करा आणि उर्वरीत कामही तातडीने पुर्ण करुन ग्रेड सेपरेटर लोकांच्या सेवेत रुजू करा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. दरम्यान, रस्त्यांचे डांबरीकरण सुरु असून या कामांच्या दर्जाबाबत तडजोड करु नये. रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना सांगितले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने |
महाराष्ट्र किसान मंच शेतकरी संघटनेतर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार |
ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी ऐवजी आता 29 जानेवारीला होणार : पालकमंत्री |
भाजपने मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती : आ. शशिकांत शिंदे |
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करा |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |