04:22pm | Jan 21, 2022 |
कराड : रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील थोर विचारवंत व रयतेचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका द्रष्ट्र्या महात्मायाला मुकला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत सेवा करण्याचे भाग्य प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना लाभले. त्यावेळेपासून ते आजतागायत ते रयतच्या सानिध्यात आहेत. 'रयत माझा श्वास आहे', असे प्रा. डॉ. एन. डी. पाटील नेहमी म्हणत असल्याचे प्रतिपादन सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात रयत संकुलाच्या वतीने प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. त्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राजमाने म्हणाले, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयतचा विस्तार, जागेचा प्रश्न, आदी. अनेक प्रश्न पूर्ण अभ्यास करून सोडवायचे. त्यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी नेहमी खुले असत. ज्याला कोणी वाली नाही, त्याला आधार देणे. दीनदलित लोकांचे प्रश्न सोडविणे हा त्यांचा स्वभाव होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, स.गा.म. महाविद्यालयाच्या जडण-घडणीत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा महत्वाचा वाटा आहे. १९५४ पासुन प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सोडविला. डॉ. पतंगराव कदम, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांसारखी माणसे काळाच्या पडद्याआड गेल्याने आम्ही पोरके झालो. प्रा. एन.डी. पाटील म्हणायचे माझे निधन झाल्यानंतर सुट्टी घेऊ नका. माझी मिरवणूक काढू नका. धार्मिक विधी कार्य करू नका. त्यामुळे विवेकनिष्ठ विचारावर श्रध्दा असणारा रयतेचा आधारस्तंभ नाहीसा झाला आहे. त्यांची शिकवण जोपासणे हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रध्दांजली ठरेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |