11:18pm | Aug 03, 2022 |
सातारा : ठाकरे कुटुंबिय अडीच वर्ष काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यांनी आम्हालाही सोबत घेतले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली होती. आम्ही कोणाशीही गद्दारी केली नाही, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री, आ. शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
मल्हारपेठ, ता. कराड येथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ज्यांना शिवसैनिक समजले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. स्वतःला विकून गद्दारी केली अशा शब्दात नाव न घेता आ. शंभूराजे देसाई यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना आ. शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार जोपासत आहोत. ठाकरे कुटुंबिय अडीच वर्ष काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यांनी आम्हालाही सोबत घेतले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केली होती. आम्ही कोणाशीही गद्दारी केली नाही. दगडूदादा सपकाळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, दगडूदादा सपकाळ सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून २०१४ साली शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. स्वतःच्या मतदारसंघात केवळ २३ हजार मते मिळवणाऱ्या सपकाळ यांनी माझ्या मतदारसंघात येऊन मला आव्हान देणे हे हास्यास्पद आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मल्हारपेठ येथे घेतलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाचे बळ होते मात्र पाटणकर गटाचे कार्यकर्ते शिवसेनेचा झेंडा कधीच हातात घेणार नाहीत. सभेला कॉन्ट्रॅक्ट बेसवर गर्दी करण्यात आली होती असा आरोपी त्यांनी यावेळी केला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |