04:50pm | May 21, 2022 |
सातारा : सातारा शहरातील 85 पैकी 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे घराचे नुकसान होणार नाही या पद्धतीने सफाई मोहिमेमध्ये त्या पद्धतीने काम केले जात आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व ओढे-नाले स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाले आहे शुक्रवारी झालेल्या पावसानंतर शहरांमध्ये काही ठिकाणी नाले गटारे तुंबले होते. झेंडा माळ, नाका, राजलक्ष्मी थेटर परिसर येथे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तातडीने तेथे सेवा रस्त्यांना उतार देऊन पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. सातारा शहरातील एकूण 85 पैकी 70 ओढयांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी तीन जेसीबी आणि दहा कामगारांची तुकडी सफाई कामासाठी आळीपाळीने वापरल्या जात आहेत. ओढ्यातील वनस्पती बाजूला करणे, नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे, तसेच त्यातील घाण जेसीबीने बाजूला करणे व उरलेला गाळ आणि इतर राडारोडा सोनगाव कचरा डेपोला स्थलांतरीत करणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत.
मुसळधार पावसामुळे शहराच्या डोंगरी भागातील माजी पेठ, केसरकर पेठ, सदर बाजार, लक्ष्मी टेकडी तसेच बोगदा परिसरातील डोंगराळ भागांमध्ये सफाई मोहिमेला गती देण्यात आली आहे. येथील कचरा तातडीने हटविण्यात येत आहे. मालशे पुलाची अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही अतिक्रमण न हटवल्याने डोंगर उतारावरून ओढयात येणारे पाणी परिसरातील घरांमध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |