08:55pm | Feb 16, 2021 |
वाई : येथील यशवंतनगर परिसरातील शिंदे कनिष्ठ महाविद्यालया नजीकच्या नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती बंगल्यात छापा टाकत गांजा लागवड करणार्या दोन सराईत जर्मन तरुणांना पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 29 किलो गांजा व इतर साहित्य असा 8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची बाजारपेठेतील किंम्मत आणखी जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा विषेश शाखा, जिल्हा पोलीस व वाई पोलीसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. सर्गीस व्हीक्टर मानका (वय 31) व सेबेस्टियन स्टेनमुलर (वय 25) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जर्मन संशयीतांची नावे आहेत.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा विशेष पथकास सोमवार दि. 15 रोजी वाईत दोन परदेशी नागरिक व्हीसा व पासपोर्ट शिवाय राहत असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कल्पना दिल्यानंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी याबाबत खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार विशेष पथक यांनी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व टिमच्या सहकार्याने नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती बंगल्यावर छापा टाकला.
यावेळी पासपोर्ट व व्हीसाबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलीसांनी घरात प्रवेश करून घरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी गांजा सदृष्य वनस्पतीची झाडे व इतर साहित्य त्यांना दिसून आले. तदनंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून स्वतः पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक गणेश किंर्दे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गांजासह इतरही काही अन्य झाडे आढळून आल्याने व गांजापासून अन्य पदार्थ बनविण्यात येत असल्याचा संशय आल्याने पोलीसांनी न्याय सहाय्यक प्रादेशीक वैज्ञानीक प्रयोगशाळा पुणे यांना पाचारण केले.
मंगळवार दि. 16 रोजी सकाळच्या सुमारास हे पथक वाईत हजर झाल्यानंतर पोलीस फौजफाटयासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या तळमजल्यावरील खोलीत, पहिल्या मजल्यावरील खोलीत व टेरेसवरही सुमारे 300 ते 400 गांजाची झाडे आढळून आली. गांजा उत्पादनासाठी लागणारे कोकोपीट, फ्लॉवर, पॉली हाऊस, थर्मामीटर, टयूब पॅनेल, इन्व्हरर्टर, बुलेट व केटीएम मोटारसायकल, तीन लॅपटॉप व तीन मोबाईल असा व 29 किलो गांजा असा सुमारे 8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
या जर्मन नागरिकांवर गोव्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्या अन्वये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यामध्ये ते जामिनावर सुटले आहेत. तसेच हा बंगला विनोद वरखडे यांच्या मालकीचा असून त्यांनी हा बंगला एका स्थानीकास भाडयाने दिला होता. स्थानीकाने हा बंगला परदेशी नागरिकांना भाडयाने दिल्याचे व गेली दोन वर्षे हे नागरिक येथे वास्तव्य करीत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात दोन महिलांचेही वास्तव्य येथे असल्याचे बोलले जात आहे. इतक्या मोठया प्रमाणावर गांजा उत्पादन कशासाठी केले जात होते. ही आंतरराज्यीय टोळी तर नाही ना? गांजाचा माल इतर कोणत्या ठिकाणी विकला जात होता काय? या प्रकरणात काही स्थानीक मदतनीस होते का? घरमालकाला या प्रकरणात अंधारात ठेवून परदेशीय नागरिकांना बंगला भाडयाने देणारा नक्की कोण? याचा तपास पोलीस यंत्रणा घेत असून काल सायंकाळ पासून जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी वाईत तळ ठोकून आहेत.
या कारवाईत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, ग्रामीण पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक आनंराव खोबरे, फॉरेंसिक लॅबचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, प्रतापराव भोसले, कृष्णा पवार, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावन राठोड, विजय शिर्के, अक्षय नेवसे, महेश पवार, बापूराव मदने, नंदकुमार महाडीक आदींनी सहभाग घेतला.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |