04:47pm | Feb 17, 2022 |
वाई : वाई तालुक्यातील खानापूर येथून चोरी झालेल्या स्कार्पिओ गाडीचा पाठलाग करत थेट मनमाडपर्यंत पोहोचून स्कार्पिओ गाडी ताब्यात घेवून याप्रकरणी जळगावच्या दोन चोरट्यांना अटक करण्याची थरारक कामगिरी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बजावली आहे. या कामगिरीबद्दल वाई पोलिसांचे अभिनंदन होत आहे. कमलेश साखरलाल महाजन (वय 23, रा. पारवा ता. जि. जळगाव) व दत्तात्रय साहेबराव पवार (वय 27, रा. कोष्टीगल्ली पारोळा ता. जि.जळगाव) अशी याप्रकरणी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, खानापुर ता. वाई येथील सुनील मोहन चव्हाण यांची स्कार्पिओ गाडी क्रमांक एम. एच. 14 ए.ई. 1703 ही मंगळवार, दि. 15 रोजी सकाळ त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरीस गेली होती. ही घटना घडल्यानंतर सुनील चव्हाण यांनी स्कार्पिओ चोरीची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रार दाखल होताच याची गांभीर्याने दखल घेत वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी लगेच गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरीचा तपास करण्याच्या सूचना केल्या.
डीबी शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्या पथकाने स्कार्पिओ चोरीचा तातडीने तपास सुरु केला. खानापूर गावापासून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना चोरीस गेलेल्या स्कार्पिओ गाडीने खेडशिवापूर नाका पास केला असल्याची माहिती मिळाली. भरणे यांनी ही माहिती तपासात असलेल्या डीबी पथकाला दिली.
तसेच पुण्याच्या दिशेने स्कार्पिओ गेल्याने भरणे यांनी तातडीने ही माहिती पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नाशिक, मनमाड येथील एलसीबीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला देऊन हद्दीत नाका बंदी करुन गाडी ताब्यात घेण्यास सांगितले. तोपर्यंत वाई पोलीस ठाण्याचे डीबी पथक रात्रभर या गाडीचा पाठलाग करत होते. तोपर्यंत मनमाड येथे चोरीस गेलेली स्कार्पिओ तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेवून ठेवली होती. तिथे चोरीच्या गाडीच्या पाठलागावर असलेले वाई पोलीस पोहोचले. त्यांनी चोरीस गेलेल्या स्कार्पिओ गाडीसह ही गाडी चोरणारे दोन संशयित ताब्यात घेतले व त्यांना वाई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गाडी चोरणारे कमलेश महाजन व दत्तात्रय पवार यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असून वाई पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |