04:17pm | Dec 08, 2020 |
सिडनी: कागांरूंना व्हॉईट वॉश देवून विक्रम नोंदविण्याची सुवर्णसंधी असलेल्या भारतीय संघाकडून आजच्या तिसर्या टी-20 सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा कहर झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 186 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळाले.
तिसर्या टी-20 लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस मैदानावर उतरलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने धमाकेदार 80 धावा केल्या. त्याला ग्लेन मॅक्सवेलने चांगली साथ दिली.
मॅथ्यू वेड आणि कर्णधार एरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. पण दुसर्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने त्यांना पहिला धक्का दिला. त्याने फिंचला शून्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथने वेड सोबत अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरेल असे वाटत असताना पुन्हा सुंदरने भारताला ब्रेक मिळवून दिला. त्याने स्मिथची बोल्ड घेतली. तो 23 चेंडूत 24 धावा करून बाद झाला.
स्मिथच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने वेडसह आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. दरम्यान वेडने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत 50 धावा केल्या. युजवेंद्र चहलच्या चेंडूवर मॅक्सवेलचा कॅच केएल राहुलने घेतला होता. पण नो बॉल असल्याने त्याला जीवनदान मिळाले. मॅक्सवेलने या जीवनदानाचा फायदा घेतला. त्याने अर्धशतक झळकावले. 19व्या षटकात शार्दुल ठाकूरने वेडची विकेट घेतली. त्याने 53 चेंडूत 80 धावा केल्या. अखेरच्या षटकात नटराजनने मॅक्सवेलची बोल्ड घेतली. त्याने 36 चेंडूत 54 धावा केल्या.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर टी नटराजन आणि शार्दुलने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |