05:53pm | Oct 27, 2021 |
कराड : युद्धभूमीवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने लढत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा देतच आम्ही शत्रूवर तुटून पडत होतो. कोणत्याही युद्धाला सामोरे जाताना शिवरायांना वंदन करून आम्ही शत्रूवर तुटून पडत होती. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच आम्हाला प्रत्येकवेळी विजयश्री मिळत गेली, असे प्रतिपादन सुभेदार मगरे यांनी केले.
श्री. छत्रपती शिवाजी उद्यान शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड येथे कराड नगरपालिका व विजय दिवस समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून "युद्धस्य कथा रम्यम्" या विषयावर मंगळवार दि.२६ रोजी सायंकाळी सुभेदार दिनकर मगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोर्णिमा जाधव, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, रमेश पाटील, बाळासाहेब मोहिते, रमेश शहा, बाळ देवधर, सुनिल सुर्यवंशी, सलिम मुल्ला आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
सुभेदार मगरे रा. मारुल हवेली, ता. पाटण गावचे सुपुत्र सुभेदार दिनकर मगरे यांचा गोवा मुक्ती संग्राम १९६०, भारत चीन युद्ध १९६२, भारत पाकिस्तान युद्ध १९६५, बांगला मुक्ती संग्रामात पाकीस्तानाशी युद्ध १९७१ या युद्धात सहभाग होता. त्यांनीं आपल्या भाषणात शत्रूशी लढताना आलेले थरारक अनुभव सांगताना, प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंगच श्रोत्यांपुढे उभा करून त्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जोषपूर्ण भाषणामुळे उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. प्रेरणादायी व देशप्रेमाची भावना निर्माण करणारे सुभेदार मगरे यांच्या या व्याख्यानाला श्रोत्यांनीही भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. भगवान खोत यांनी केले. वक्त्यांची ओळख व आभार प्रदर्शन विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |