10:51pm | Jul 07, 2020 |
सातारा : कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने गेले आठवडाभर हबकून गेलेल्या सातारा जिल्हावासीयांना आज एका दिवसात तब्बल 46 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला. या 46 जणांसह जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 859 पर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने या समाधानाला चिंतेची किनार आहे.
मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात उत्साहवर्धक चित्र तयार झाले होते. एकूण रूग्ण आणि त्यातून बरे झालेले रूग्ण यातील दरी मिटत आली होती. मात्र या आठवड्यात रूग्णांच्या संख्येने उसळी घेतल्याने जिल्हावासीयांचे जणू अवसान गळाले होते. अशा अस्वस्थ वातावरणात आज तब्बल 46 बाधितांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे जिल्ह्याला मोठाच दिलासा मिळाला आहे.
आज डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक, शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, धावली (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
दरम्यान, येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशीरा कान्हरवाडी (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष व जिहे (ता. सातारा) येथील 58 वर्षीय पुरुष या दोन कारोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच याच रुग्णालयात फडतरवाडी (ता. फलटण) येथील 42 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या वाढून 58 पर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, सातारा नगरपरिषद हद्दीतील मौजे बुधवार पेठ व सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे करंडी, धनगरवाडी (कोडोली), कारंडवाडी, पाटखळ (माथा) क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. सातारा नगरपरिषदेच्या या क्षेत्रात उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.
सातारा जिल्ह्यात आणखी 11 बाधित
काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 11 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 याप्रमाणे रूग्णांचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील धनगरवाडी, कोडोली येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 42 वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी, जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 34 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |