सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या कोयना अभयारण्यात मुंबईहून आलेल्या पर्यटकांना अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांना मोठा आनंद झाला. दरम्यान, त्याच्या दर्शनाने त्या अभयारण्यातील अस्वलाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणारे कोयना व चांदोली अभयारण्य हे पर्यटकांना एक खास आणि मानवी हस्तक्षेप नसलेले पर्यटनक्षेत्र झाले आहे. येथील वनसंपदा, वन्यजीव, सडेपठार, उंचच -उंच धबधबे, आकर्षित अशा डोंगररांगा, येथील रंगिबेरंगी फुलपाखरे, पक्षी, जैव विविधतेने नटलेला परिसर, संशोधकांसाठी उत्तम असे पश्चिम घाटात येत असलेले ठिकाण, येथील विविध वनस्पती, प्राणी, पक्षी त्यामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे.
कोयना विभागातील स्थानिक हे वन विभागाच्या बरोबरीने लोकांमध्ये जंगलाबद्दल जनजागृतीचे काम करत आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून शाश्वत विकासासाठी वनांचे महत्त्व स्थानिकांना पटवून देत आहेत. मुंबईहून आलेले पर्यटक डॉ. सुधीर गायकवाड, दीपा सापने, स्वानंद पाटील आणि त्यांचे सहकारी कोयना टीमसोबत पक्ष्यांची छायाचित्रे टिपत असताना वन्यजीव आणि पक्षी अभ्यासक संग्राम कांबळे, सागर जाधव व महेश शेलार यांना काही अंतरावर झुडपांमध्ये हालचाल आढळून आली.
त्यांनी सगळ्यांना शांत राहून वाहनामध्ये बसायला सांगितले. सगळेच त्या दिशेने बघायला लागले, तर झुडपातून अस्वल बाहेर आले. त्यामुळे सगळेच अचंबित झाले. थोडी जरी चाहूल लागली की, जंगलात गायब होणारे निशाचर अस्वल, भरदुपारचे आज प्रत्यक्षात मोकळ्या मैदानात खात-खात पुढे सरकत होते. अस्वलाचे नाक हे हवेतील गंध आणि त्यातील बदल लगेच ओळखते. परंतु, यावेळी ते स्वतःच्या मस्तीमध्ये खाण्यात गुंग होते. पक्षी निरीक्षण करताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अस्वल सगळ्यांना बघायला मिळाल्याने पर्यटक खूष झाले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |