02:33pm | Jan 21, 2022 |
जावली : युथ थिएटर कला शैक्षणिक व सामाजिक संस्था, सातारा व जावली कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जावली तालुक्यातील कास बामणोली येथील सावरी येथे मंगळवार दि. १८ रोजी घनकचरा निर्मिती आधुनिक शेती व बाजार व्यवस्थापन याविषयीची एकदिवशीय कार्यशाळा व पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
युथ थिएटर कला शैक्षणिक व सामाजिक संस्था, सातारा आपल्या सामाजिक कामाचा भाग म्हणून विविध सामाजिक कामे करत आहे. आपल्या विविध शासकीय कार्यालयाच्या मार्फत राबल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील गेली पाच वर्ष शासकीय नियमानुसार सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. म्हणूनच सामाजिक भान म्हणून जावली तालुक्यातील गावामध्ये जनजागृती होऊन येथील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, पर्यटन विकास होऊन, तेथील आर्थिक विकासाला चालना मिळावी.
ग्रामीण जनतेला रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत हा उद्देश समोर ठेवून सामजिक संस्था ग्रामीण क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून घनकचरा निर्मितीतून सेंद्रीय खत निर्मीती करुन त्या आधारे आधुनिक शेती कश्याप्रकारे करावी आणि त्यातून येणाऱ्या पिकांना बाजारात बाजारपेठ कशी मिळून देता येईल याचे संशोधन करून व त्या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासू व्यक्तींना संपर्क करून जी माहिती मिळाली त्याद्वारे त्यांचे नाट्यरूपांतर करून पथनाट्य द्वारे कचरा समस्या की संधी व कचऱ्या द्वारे सेंद्रिय खत निर्मिती कशी केली जाते, त्याचा उपयोग काय आहे, हे सांगून आपल्या ग्रामीण भागामध्ये तेथील वातावरण, हवामान यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी पिके घेतली जातात ती पिके आपण कशी येथे पिकवू शकतो आणि त्या पिकांची बाजारपेठेमध्ये कशी विक्री केली जाते, याची माहिती देऊन पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न संस्थेच्या कलाकारांनी केला.
या कार्यक्रमास जावली तालुका कृषी विभाग व कृषी साहय्यक अधिकारी मिलिंद बर्गे, माजी मंडल कृषी अधिकारी आर. आर. देशपांडे तसेच कृषी अधिकारी विशाल डांगरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर सावरी येथील किशोर शिंदे, यशवंत शिंदे, संतोष शिंदे, विलास कांबळे व ग्रामस्थांनी देखील मार्गदर्शन करुन कलाकारांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण पवार यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापनाची जबाबदारी उपाध्यक्ष अमित परिहार यांनी पार पाडली. यावेळी कलाकार नम्रता धनावडे, अक्षय साळुंखे, उदय बाबर, जयदेव भालेराव, महेश चव्हाण, राहुल घोरपडे, हनमंत शिंदे, हर्षद साळुखे, प्रतीक बनसोडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |