09:23pm | Apr 25, 2020 |
सातारा : संचारबंदीच्या काळात सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सेनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप होत असून त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात न आल्याने त्यांचे आरोग्य 'रामभरोसे' सोडून देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा पालिकेमध्ये एकूण २९२ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील साफसफाई, ओढे आणि नाल्याची स्वच्छता, उद्यानांची साफसफाई अशा प्रकारची ते कामे करतात. २९२ पैकी २४१ आरोग्य कर्मचारी ऑन फिल्डवर कार्यरत आहेत. त्यापैकी ५१ आरोग्य कर्मचारी शहरातील नालेसफाईसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या सातारा शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरपालिका ही त्यामध्ये सक्रीय झाली आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी वित्त आयोगातून सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लॉक डाऊनच्या काळामध्ये सातारा नगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले सेनिटायझर आणि मास्क हे निकृष्ट दर्जाचे असून त्याला कोणतीही क्वालिटी नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मुळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम हे अत्यंत जोखमीचे असून जीवावर उदार होऊन ते आपले कर्तव्य बजावत असतात अशावेळी त्यांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधा या अत्यंत दर्जेदार असणे खूप गरजेचे असताना त्याकडे मात्र पालिकेतील कोणत्याही अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे अवस्था अडगळीत पडलेल्या मुसळासारखी झाली आहे. दोन दिवसापूर्वी सोनगाव येथील कचरा डेपोला आग लागली होती ती आज विझवण्यासाठी पालिकेचे अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाचे २४ कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ती आग आटोक्यात आली होती. सध्याच्या परिस्थितीत आज भिजवल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य रामभरोसेच असल्याचे समजण्यात येत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |