01:57am | Nov 18, 2019 |
खंडाळा : शिरवळ ता.खंडाळा येथील प्रगती गर्ल्स हायस्कुलच्या शिक्षिकेची विविध प्रकारे २८ लाख ५६ हजार ४८५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम प्रसारक मंडळाच्या संस्थापक सचिव प्रताप चंद्रकांत देशमुख (वय ५२) व प्रगती गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कल्पना खिराप्पा पाटील (वय ५० दोघे रा.शिरवळ ता.खंडाळा ) यांचा अटकपूर्व जामीन सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती फिर्यादी उज्ज्वला सोनावणे यांनी दिली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला खंडाळा न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रगती गर्ल्स हायस्कुल आहे. याठिकाणी शिक्षिका म्हणून उज्ज्वला हणमंत सोनावणे ( वय ४२ , रा. म्हावशी ता.खंडाळा ) या ९ जून २००३ पासून कार्यरत आहे. दरम्यान, संबंधित संस्थेचा संस्थापक प्रताप देशमुख व मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी संगनमताने उज्ज्वला सोनावणे यांची कोणतीही परवानगी न घेता सातारा जिल्हा सहकारी बँकेतील ५ लाख ५० हजार रुपये केलेले कर्जप्रकरण , शिवकृपा सहकारी पतपेढी कर्जप्रकरण ६ लाख रुपये, सन २००९ ते २०१२ दरम्यानची विविध प्रकारे केलेली १२ लाख रुपयांची फसवणूक, आयकर रक्कम १ लाख ११ हजार ५५२ रुपये, नौकरीला रुजू होतेवेळी घेतलेली रक्कम ३ लाख रुपये, गणवेशाची रक्कम ५ हजार रुपये, स्कुल बस १८ हजार रुपये, पेन्शन केस २५ हजार रुपये , पुस्तक खरेदी ४ हजार रुपये अशी २८ लाख ५६ हजार ४८५ रुपयांची फसवणूक केल्याबाबतचा खाजगी दावा प्रगती गर्ल्स हायस्कुलच्या शिक्षिका उज्ज्वल सोनावणे यांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय याठिकाणी दाखल केला होता. त्यानुसार खंडाळा न्यायालयासमोर सुनावणी होत श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचा संस्थापक सचिव प्रताप चंद्रकांत देशमुख (वय ५२) व प्रगती गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कल्पना खिराप्पा पाटील (वय ५० दोघे रा.शिरवळ ता.खंडाळा ) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडाळा न्यायालयाने शिरवळ पोलीसांना दिलेहोते. यावेळी शिक्षिका उज्ज्वला सोनावणे यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी संबंधितांनी न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला होता. यावेळी याबाबतची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालय याठिकाणी होत सहाय्यक सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांनी सचिव प्रताप देशमुख व मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरवळ पोलीस हे करीत आहे.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |