वाई : येथील एमआयडीसी मधील सुप्रीम हॉटेलमध्ये मद्यरात्री घुसून जबदस्ती बिअर ची मागणी करून त्यानंतर न दिल्याच्या कारणावरून चिडून हॉटेलमधील कडप्पा तोडला तसेच शिवीगाळ करून हॉटेल मॅनेजरला धमकावल्या प्रकरणी पोलिसांनी मयूर रवींद्र गाढवे (वय२१ रा. बोबर्डी) व स्वप्नील प्रदीप जगताप (वय १९ रा. लोहारे) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, एमआयडीसी मधील हॉटेल सुप्रीम येथे मॅनेजर म्हणून काम करणारे रमेश शंकर चव्हाण (मूळ गाव रा. साईनगर कोरेगाव) हे नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करून हॉटेल मधीलच एका रम मध्ये पत्नी व मुलांसोबत झोपले होते. मद्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक खिडकीचा आवाज आल्याने चव्हाण हे जागे झाले. व कोण बाहेर आहे असे विचारले असता बाहेरून दोन तरुणांनी आम्हाला बिअर पाहिजे. हॉटेलचा दरवाजा उघडा असे सांगून ओरडत होते. यावेळी चव्हाण यांनी आता हॉटेल बंद आहे. बिअर मिळणार नाही असे सांगितल्यानंतर आरोपी गाढवे व जगताप यांनी मुख्य दरवाजा तोडून हॉटेल मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोघांनी चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी करत आम्हाला आताच बिअर पाहिजेत. मात्र चव्हाण यांनी नकार दिल्याने गाढवे व जगताप यांनी चिडून जाऊन टेबलवर असलेले कडप्पा ढकलून तोडून दिले. तसेच तुझ्या लहान मुलाला जीवे मारून टाकेल असे धमकी देऊन तेथून निघून गेले.
याबाबतची कल्पना चव्हाण यांनी तात्काळ वाई पोलिसांना कळवलं नंतर रात्र गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आपला मोरचा एमआयडीसी कडे वळवला. चव्हाण यांच्याकडून सर्व घटना समजून घेतल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात त्या दोघांचा शोध सुरू केला तेव्हा ते दोघे पोलिसांना सापडले. पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी देणे, तोडफोड करणे, जबरदस्तीने हॉटेलमध्ये घुसणे, असा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकदिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर करीत आहेत.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |