03:35pm | Dec 31, 2019 |
पुसेसावळी : पुसेसावळी (ता. खटाव) येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत रविवारी मध्यरात्रीनंतर दरोडा पडला असून तब्बल 1 कोटी 66 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे. त्यामध्ये सुमारे अर्धा कोटीची रोकड असून साडेतीन किलो वजनाचे सोने लंपास करण्यात आले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिस दलासमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणी बोलवण्यात आलेल्या श्वानपथकालाही दरोडेखोरांचा माग काढता आला नाही.
या बँकेचा परिसर निर्जनस्थळ असून शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुट्टी आल्याने चोरट्यांनी डाव साधला.प्रथमदर्शनी दरोडेखोरांनी बँकेच्या पश्चिमेकडील लोखंडी ग्रील कटरच्या सह्याने कट केले. त्यानंतर आतील दरवाजा उघडला. सुरू असलेल्या बल्बवर कापड टाकून व सीसीटीव्हीची दिशा बदलून त्यांनी स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केला. स्ट्राँगरूममधील लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने कट केली. तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यातील 1 कोटी 18 लाख 45 हजार 540 रुपयांचे सोने व 47 लाख 50 हजार 619 रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
सोमवारी सकाळी कर्मचारी बँक उघडण्यासाठी गेल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरी झाल्याची बातमी पसरताच अनेक वैयक्तिक लॉकर असलेले ग्राहक बँक परिसरात दाखल झाले होते. बँकेतील झालेल्या चोरीने ग्राहकांचे धाबे दणाणले. पोलिसांचा प्राथमिक पंचनामा झाल्यानंतर सोने व लंपास झालेल्या रोकडची माहिती बँकेच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पुसेगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |