04:55pm | Dec 10, 2019 |
कराड : कराड - चांदोली मार्गावर लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत सकाळी सहाच्या सुमारास एसटी व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दादर (मुंबई) येथील एक महिला ठार झाली. तर कारमधील चार जणांसह एसटीमधील सुमारे 11 विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहेत.
विजया विनायक नाईक (वय 42) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर कारचालक इजाज मकराणी (रा. अंधेरी, मुंबई), अजय दत्तात्रय कीर (41), सुवर्णा दत्तात्रय कीर (70), अंजली अजय कीर (सर्व रा. दादर, मुंबई) अशी कारमधील चौघा जखमींची नावे आहेत. तर श्रेया शिरसाठ, मेघा शिरसाठ, नम्रता शिरसाठ (सर्व रा. मेणी शिरसाठवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), अजय सावंत, दीपक जाधव या पाचजणांसह एसटीतील सुमारे 11 शालेय विद्यार्थी जखमी झाल्याचे कराड तालुका पोलिसांनी सांगितले.
विजया नाईक यांच्यासह कीर कुटुंबीय मुंबईहून कराड - चांदोली मार्गाने रत्नागिरीकडे निघाले होते. हे सर्वजण रत्नागिरीतील एका आजारी नातेवाईकास पाहण्यासाठी निघाले होते. हे सर्वजण इजाज मकराणी यांच्या स्विफ्ट कारमधून रत्नागिरीकडे जात असताना कराड - चांदोली मार्गावर येणपेजवळील लोहारवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला.
कराड आगाराची एसटी रविवारी रात्री मुक्कामासाठी शेडगेवाडीला गेली होती. सकाळी सहाच्या सुमारास एसटी शेडगेवाडीहून विद्यार्थ्यांना घेऊन कराडकडे येत होती. त्यावेळी लोहारवाडीनजीक कार चालक मकराणी याचा कारवरील ताबा सुटून कारची एसटीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर एसटीच्या चालकाकडील उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. धडक टाळण्यासाठी एसटी चालक चव्हाण यांनी अचानक बे्रेक मारत एसटी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एसटीमधील सुमारे 11 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
तर कारमधील कीर कुटुंबिय आणि मृत विजया नाईक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने कारमधील चौघा जखमींंना मलकापूर (कराड) येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर एसटीमधील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी उंडाळे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, उपचार सुरू असताना गंभीर जखमी झालेल्या विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे कराड - चांदोली मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली असून हवालदार राजे तपास करीत आहेत.
भरधाव वेगातील कार समोर येऊन धडकणार हे लक्षात येताच एसटी चालक चव्हाण यांनी एसटी रस्त्याकडेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अरूंद रस्ता आणि बाजूला असलेला खोल खड्डा आणि नाला यामुळे प्रयत्न करूनही एसटी रस्त्यावरून बाजूला घेता आली नाही. चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत एसटी रस्त्यावरून खाली घेतली असती तर एसटी पलटी होऊन मोठा अनर्थ घडला असता.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |