वाई : आपल्या विविध मागण्यांच्या न्याय हक्कासाठी धोम व कण्हेर धरणग्रस्तांनी आज बोरीव ता. वाई येथील धोम जलाशयात जनजागरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जल आंदोलन केले. यामध्ये महिलांसह शेकडो धरणग्रस्त सहभागी झाले होते. दरम्यान दिवसभरात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेटी देऊन आपली मागणी शासन स्तरावर तात्काळ पोहचवून ती मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, व दीपक पवार यांनी १५ दिवसात संबंधित मत्र्यांशी यासंदर्भात बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले.
धोम व कण्हेर धरणाच्या उभारणीत शेकडो एकर जमिनी गेलेल्या धरणग्रस्तांना गेली ४० वर्ष पर्यायी जमिनी अद्याप दिल्या गेलेल्या नाही यासंदर्भात शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही राज्यातल्या कोणत्याच सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही. वास्तविक धरणग्रस्त कब्जे हक्काची रक्कम भरण्यास तयार असताना जिल्हा पुनर्वसन विभाग तांत्रिक अडचणी सांगून आमची दिशाभूल करत आले आहे. विद्यमान सरकारने ही आमच्या मागणीकडे कानाडोळा केल्याने संतप्त धरणग्रस्तांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी धोम व कण्हेर धरणग्रस्तांनी जनजागरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीव येथील धोम जलाशयात पाण्यात उतरून जल आंदोलन केले. दुपारपासून पुनर्वसन अधिकारी, वाई तहसीलदार तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आदींनी आंदोलन स्थळी जाऊन धारणग्रस्तांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी धरणग्रस्त व जनजागरण प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला व आपल्यामुळेच आमचे प्रस्ताव धूळखात पडून असल्याचा आरोप केला. सायंकाळी पाच वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच भाजपचे नेते दीपक पवार, गजानन भोसले आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपली मागणी येत्या पंधरा दिवसात कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. येत्या दोन दिवसात पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन याविषयासंबंधीची स्वतंत्र बैठक मंत्रालयात घेण्याचेही आश्वासन पावसकर, पवार व भोसले यांनी दिले. जनजागरण प्रतिष्ठानने तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास सर्व धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |