शिरवळ : येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-या मुख्य सूत्रधारासह कटात सहभागी असणाऱ्या दोघांना खंडाळा पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. हल्ल्याप्रकरणी मुख्य 'मास्टरमाइंड' आझाद परमिट रुमचालक सद्दाम उर्फ भैय्या अमीर खान व हल्ला करण्याकरिता कटात सहभागी असल्याप्रकरणी सद्दाम खान (वय ३०) याचा चुलता काली उर्फ अशपाक शमशुद्दीन खान (वय ४० दोघे रा. शिरवळ ता.खंडाळा ) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.दरम्यान , संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी.एम.गिरी यांनी दोघांना आठ दिवसांची मंगळवार दि.२३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल हे ११ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना एका वीटभट्टीलगत दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सत्तूर,चाकू,दगड यांच्यासह पत्रकार मुराद पटेल यांच्यावर अचानकपणे प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये पत्रकार मुराद पटेल हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने ,सातारा शहर पत्रकार संघासह विविध स्तरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली होती. यावेळी या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व शिरवळ पोलीसांनी केलेल्या तपासामध्ये शिरवळ येथील तडीपार गुंडाचा व जीएसटी अधिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये बातम्या दिल्याच्या कारणावरून राग मनात धरत आझाद परमिट रुम या दारू दुकानाचा चालक सद्दाम उर्फ भैय्या खान याने पुणे येथील हल्लेखोरांना पत्रकार मुराद पटेल यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. यामध्ये घटना घडल्यापासून मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला होता तर याप्रकरणी हल्लेखोरांपैकी इस्माईल मौल्लाली मकानदार (वय २५), रोहन रोहिदास पवार (वय २२) , जावेद मेहबूब मुल्ला (वय २३, तिघे रा. संतोषनगर ,कात्रज पुणे ) यांना पोलीसांनी शिताफीने अटक केली होती. याप्रकरणी सध्या तिघेही कळंबा कारागृह याठिकाणी न्यायालयीन कोठडीत आहे.त्याचप्रमाणे हल्लेखोरांपैकी मोहसीन मेहबूब मुल्ला , शेखर ठोंबरे , शफिक अब्दुल नगराळे-शेख (सर्व रा. संतोषनगर ,कात्रज,पुणे) हे तीन हल्लेखोर घटनेपासून अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलीसांकडून सुरु आहे दरम्यान, मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याने सातारा जिल्हा न्यायालयातून २९ मे रोजी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. यावेळी सद्दाम उर्फ भैय्या खान याने याप्रकरणी अंतरिम जामीन मिळविण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी होत अतिरिक्त सातारा जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांनी मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याचा अटकपूर्व जामीन व हल्लेखोर मोहसीन मुल्ला याचा अटकपूर्व जामीन अर्ज व अटकेत असलेले हल्लेखोर इस्माईल मकानदार व रोहन पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुख्य सूत्रधार आझाद परमिट रूम चालक सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला होता. यावेळी पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यामध्ये कटात सहभागी असल्याप्रकरणी शिरवळ येथील आझाद थिएटरचा मालक काली उर्फ अशपाक खान याला खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व खंडाळा पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केल्यानंतर या प्रकरणामध्ये घटनेपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या अमीर खान याच्या मुसक्या खंडाळा पोलीसांनी आवळत त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दरम्यान, संबंधितांना खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी.एम.गिरी यांच्यासमोर सुनावणी होत न्यायालयाने मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याचा चुलता काली उर्फ अशोक खान व मुख्य सूत्रधार आझाद परमिट रूमचा चालक सुदाम उर्फ भैय्या खान या दोघांना मंगळवार दि. २३ जुलै पर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करत आहे.
मुख्य आरोपींच्या अटकेनंतर खंडाळा पोलीस स्टेशनला लोकप्रतिनिधीचा ठिय्या
शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खानसह त्याचा चुलता काली उर्फ अशपाक खान याला कटात सहभागी असल्याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी व खंडाळा पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केल्यानंतर त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी खंडाळा तालुक्यात पसरली. एकीकडे खंडाळा पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वसामान्यातून स्वागत होत असताना खंडाळा पोलीसांनी अटक केल्या आरोपींचा कळवळा आलेल्या एका पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या एका लोकप्रतिनिधीने व काही दलालांनी खंडाळा पोलीस स्टेशनला ठिय्या मांडत खंडाळा पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पोलीसी हिसका दाखवताच संबंधितांनी पोलीस स्टेशनमधून काढता पाय घेतला.
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |