03:06pm | Sep 09, 2018 |
सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक भुमीवरील सातारा रेल्वेस्टेशन हे हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकसित करणेबाबत, तत्कालीन रेल्वे मंत्री मा.सुरेश प्रभु आणि विद्यमान रेल्वेमंत्री मा.ना.पियुष गोयल यांनी मान्यता दिलेली आहे, त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा, लोणंदच्या औद्योगिक वसाहतीलगत रेल्वे गुडस् शेड उभारणे, रेल्वेच्या मालाची चढ-उतार करण्यासाठी, कायद्याने मान्यता असलेल्या रजिस्टर माथाडी बोर्डातील माथाडी कामगारच असेल पाहीजेत, बहिस्थ व्यक्तींचे तेथे चोचले पुरवले जावू नयेत, कराड-सातारा-पुणे डेली शटल सेवा सुरु करावी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, तसेच या मार्गावर गतीमान रेल्वे वाहतुकीसाठी दुहेरी लोहमार्ग उभारणे, कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग यासह वाठारस्टेशन, रहिमतपूर,मसूर येथे रेल्वे का्रॅसिंगच्या ठिकाणी ओव्हरब्रीज उभारणेच्या आदी कामांचा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या अधिकार्यांसमवेत आढावा घेतला. त्याचबरोबर ही सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण झाली पाहीजे, त्यामुळे लोकांचे हित साधले जाणार आहे अशी आग्रही भुमिका मांडली.
रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गात येणार्या सन्माननीय संसद सदस्यांच्या रेल्वे ध्संबंधीच्या प्रश्नाबाबत रेल्वेच्या महाप्रबंधकांनी दिनंाक 07/09/18 रोजी डिआरएम ऑफिस पुणे येथे आयोजित केलेल्या बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, खा.वंदना चव्हाण, खा.आढळराव पाटील,खा.संजयकाका पाटील,खा.विजयसिंह मोहिते पाटील,खा. शरद बनसोडे, खा. सदाभाउ लोखंडे, हे संसद सदस्य तर सेन्ट्रल रेल्वेचे महाप्रबंधक एस.एम.शर्मा, पुणे डिआरएम देवूस्कर, मुख्याधिकारी तिवारी, गुप्ता, वाणिज्य अधिकारी कृष्णा पाटील, यांचेसह अशोक सावंत, काका धुमाळ, माजी नगरसेवक संजय शिंदे, संग्राम बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे ते मिरज या लोहमार्गावर सध्या एकच रेल्वे मार्ग आहे, त्याचे दुहेरी करणाचे काम हाती घेण्यात आले आहे, त्याकरीता ज्यांची जमिन जाणार आहे त्यांना मोबदला दिला जावून, कोणत्याही परिस्थिंतीत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम गतीमानतेने वेळेत पूर्ण होईल अशी कार्यवाही करावी अशी मागणी करतानाच, सातारची भूमी मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते, या भूमीतील सातारा रेल्वेस्टेशनचा विकास हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून करणेबाबत आम्ही तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेसमवेत तसेच विद्यमान रेल्वे मंत्री ना.पियुष गोयलसाहेब यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्याकरीता सातारा रेल्वेस्टेशनचा हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकास करणेबाबत जरुर तो प्रस्ताव तयार करुन, सादर कराव. लोणंद येथे रेल्वेने येणार्या मालाची चढ-उतार करण्यासाठी बहिस्थ व्यक्तींचे चोचले पुरवले जात आहेत, ते त्वरीत बंद करुन, याठिकाणच्या कामासाठी रजिस्टर्ड माथाडी बोर्डातीलच कामगारांनाच ते काम देण्यात यावेत, लोणंद-शिरवळ आदी ठिकाणी कोटयावधींची औद्योगिक गुंतवणुक होत असल्याने, तसेच रेल्वेची वाहतुक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त असल्याने, या भागाच्या जलद व कमी खर्चीक दळणवळणाकरीता कराड-सातारा-पुणे अशी रेल्वेची शटलसेवा तातडीने सुरु करावी अशी सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
तसेच मसुर, वाठारस्टेशन,रहिमतपूर येथील रेल्वे कॉसिंगच्या ठिकाणी वाहतुक रेल्वे जाईपर्यंत खोळंबु नये म्हणून ओव्हरब्रिज उभारावेत, कराड-चिपळुण नवीन रेल्वे मार्गाबाबत जुन्या निविदा धारकाने काम करण्यास असमर्थता दर्शवली असल्याने, नव्याने निविदा काढुन वेळेत काम पूर्ण होईल अशी कार्यवाही करावी. सातारा जिल्हयातील लोणंद एमआयडीसीला हायवे आणि रेल्वे स्थानक दोन्ही समान अंतरावर आहे, त्यामुळे याठिकाणच्या औद्योगिक विकासाकरीता रेल्वे गुडस शेड उभारणे आवश्यक असल्याने, गुडस शेड उभारावी अशा अनेक सूचना केल्या.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेहमीच भारतीय रेल्वे खात्याला मौलिक सूचना केलेल्या आहेत, त्यांच्या सूचनांचा आदर केला जावून, रेल्वेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिक भर दिला जाईल असे रेल्वेचे जनरल मॅनेजर शर्मा यांनी यावेळी नमुद केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |