‘चेहर्यावर काळे डाग पडले आहेत...बारीक तांबूस पुळ्या उठल्या आहेत. त्यामुळे त्या सुंदर युवतीचा प्रत्यक्षात देखणा असलेला चेहरा झाला आहे विद्रुप...’
वरीलप्रमाणे तक्रारी असताना निदान करण्यासाठी कुणा निष्णात अशा डॉक्टरची गरज नाही. कुणीही चटकन सांगेल... या तारुण्यपीटिका बरं का...!
तारुण्यपीटिका, युवानपीडका, मोड्या, मुरमं, पिंपल्स या सामान्य नावाने ओळखला जाणारा हा तारुण्यात होणारा आजार. तरुणाई म्हणजे मानवी जीवनाच्या बगीच्यात उमललेली फुले. अनेक साहित्यिकांनी तारुण्याची प्रशांसापर वर्णने केलेली आहेत. वास्तविक, असे हे वरदान स्वरुप तारुण्य सर्वच तरुण, तरुणींना समान लाभदायक ठरावे असे असताना, तारुण्याच्या उंबरठ्यावर असंख्य सौंदर्यलतिकांना हे तारुण्य त्रासदायक वाटू लागते ते त्यांना हैराण करणार्या पिंपल्समुळे!
मुळातच सुंदर असणारा मुलीचा चेहरा तिने तारुण्यात प्रवेश केला की, गुलाबपुष्पाप्रमाणे उमलतो. मग, नकळत चोराच्या पावलांनी ‘गुलाबाला काटे’ या न्यायाने त्याच सुंदर चेहर्यावर मुरमे, पुटकुळ्या उमटू लागतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्या अनेक सौंदर्य लतिकांना पिंपल्समुळे त्रासदायक वाटू लागते. बर्याच स्मार्ट मुलींची लग्ने ठरवण्याच्या बाबतीत हीच मुरमे आडवी येतात. त्यामुळे त्यांची लग्ने जमायला उशीर होतो तर कित्येक कॉलेज कन्यका तारुण्यपीटिकांनी त्रस्त झालेल्या असतात.
पिंपल्ससाठी नाना प्रकारचे उपाय केले जातात. भरीत भर म्हणजे तारुणपीटिकांवर औषधच नाही. वय वाढले की त्या आपोआप कमी होतात असा सोयिस्कर गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. परंतु, योग्य पथ्यपाणी, औषध आणि आहारविषयक नियमांचे पालन केले तर, पिंपल्सला तुम्ही गुडबाय म्हणू शकता.
Team Age म्हणजे प्रत्येक व्यक्ती, मग ती मुलगा असो की मुलगी. वयात येताना तेरा- चौदा वर्षांनंतर शरीरात हार्मोनल बदल होतात त्यामुळे चेहेर्यावर पिंपल्स उठू शकतात. त्याचे कारण म्हणजे अतिशय तेलकट पदार्थ, अतिशय थंड पदार्थांचे सेवन करणे, पचन शक्तीचा विचार न करता अहितकर पदार्थांचे भरपूर सेवन करणे, जसे मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, हातगाड्यांवरील पदार्थ वरचेवर खाण्यामुळे दूषित झालेले रक्त, क्लेदासह चेहर्याच्या त्वचेच्या आश्रयाने संचित होतात आणि चेहर्यावर सार्वत्रिक पुटकुळ्या निर्माण होतात.
चेहर्याला विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने लावणे, दाहक आणि आम्लयुक्त साबणांचा चेहरा धुण्यासाठी वापर करणे, तसेच चेहर्याची नियमित स्वच्छता न ठेवल्यास कृमी प्रादुर्भावामुळे तारुण्यपीटिका वाढतात.
तरुण मुलींच्या बाबतीत त्यांच्या मासिक पाळीपूर्वी, मासिक पाळी सुरू असताना किंवा मासिक पाळीनंतर तारुण्यपीटिका जास्त प्रमाणात दिसतात आणि त्रास वाढलेला आढळतो.
उपाय
* रोज दिवसातून 2-3 वेळा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा आणि कोरडा ठेवावा.
* साबणाऐवजी चण्याचे पीठ किंवा बेसन पीठात दूध मिसळून लावावे.
* चेहर्याला रोज रात्री चंदन, गवली, गुलाब पाकळी, मंजिष्ठा, हरिद्रा यांचा लेप लावावा.
* दुधाच्या सायीत 1/2 थेंब लिंबू रस पिळून त्याने चेरा स्वच्छ करावा.
* चंद्रप्रभा वटी, रजःप्रवर्तीनी वटी, आरोग्यवर्धीनी वटी या गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ 1/1 कोमट पाण्यासह घ्याव्यात.
* आहारात हिरवी मिरची, हरभरा डाळ, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड वर्ज्य करावे.
* हलके, ताजे, गरम भोजन ठेवावे. मुगाचे वरण, देशी गाईचे तूप, ताक आहारात ठेवावे.
* सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, सिझनल फळे अवश्य खावीत.
* 1 ग्लास दूध, अर्धा कप पाणी, 1 चमचा हळद, 1 वेलदोडा कुस्करून, बोटभर ताजे आल्ले चेचून घालून उकळावे आणि गाळून प्यावे.
* मन प्रसन्न, आनंदी, प्रफुल्लीत ठेवावे. मनातला न्यूनगंड पिंपल्समुळे आलेला त्रस्तपणा कमी करावा.
* कुठलेही रासायनिक औषध, लोशन, मलम, क्रीम तजज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
या सर्व गोष्टींचे पालन केले तर तरुण, तरुणींनो तुम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकता ‘गुड बाय पिंपल्स!’
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |