02:04am | Dec 18, 2019 |
इस्लामपुर : नियमित व्यायामास प्रोत्साहन देण्यासाठी इस्लामपूर मध्ये प्रथमच भव्य राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे सर्जेराव यादव स्पोर्टस अॅकेडमीतर्फे आयोजन करण्यात आले आहे. दि.२५ डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटाला आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सर्जेराव यादव यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीतून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात सर्जेराव यादव स्पोर्टस अँकँडमीची ओळख निर्माण झाली आहे.या अँकँडमीने दि.२५ डिसेंबर रोजी इस्लामपुर मध्ये भव्य राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा अॅथेलेटीकस असोशियनची मान्यता मिळाली
असल्याची माहिती अॅकेडमीचे संस्थापक, उद्योजक सर्जेराव यादव यांनी दिली.
या मँरेथॉन स्पर्धेस स.७ वा.अनेक मान्यवरांच्या उपस्थित प्रारंभ होणार असून मुला-मुलीचा (खुला गट) वय वर्षे १४ ते १७ यांच्या साठी आहे. त्यांना अनुक्रमे ३,५,१० कि.मी. अंतर आहे. या
स्पर्धेची सुरुवात सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलपासुन सुरू होणार असून स्पर्धेचा मार्ग हॉल ते बहे नाका ३ कि.मी.तर हॉल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इस्लामपुर असा ५कि.मी. अंतराचा असेल. हॉल ते राजारामनगर पेट्रोल पंप साखराळे ते हॉल १० कि.मी. असा असणार आहे.
या स्पर्धेत उत्तम आरोग्य, झाडे लावा- झाडे जगवा,मरावे परी वृक्ष रूपी उरावे, बेटी बचाव बेटी पढ़ाव, व्यसनमुक्ती, निसर्ग संरक्षण असे विविध सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश दिले जाणार आहेत.
या मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक असणारे अॅकँडमीचे संस्थापक सर्जेराव यादव यांनी
,"प्रत्येकाने शाररीक, मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम हा वाँकींग, ट्रेकींग,रनींग, नियमीतपणे योगासने या माध्यमातून करावा. व्यायामाची जनजागृती आणि आवड निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील मुला, मुलींना या मँरेथाँन क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे. इस्लामपुर सारख्या प्रगतशील शहरांमध्ये नवनवीन, दर्जेदार सामाजिक उपक्रम राबविण्याच्या
उद्देशाने या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनसाठी राज्य भरातून सुमारे शेकडो स्पर्धक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील प्रथम क्र.२००१, व्दितीय क्र.१५०१, तृतीय क्र. १००१ आणि शिल्ड तर १७ वर्षे वयोगटातील प्रथम क्र.३००१, व्दितीय क्र.२००१ तृतीय क्र.१५०१ आणि शिल्ड दिली जाणार आहेत.
खुले वयोगटातील मुले प्रथम क्र. १०००१, व्दितीय क्र. ७००१, तृतीय क्र. ५००१आणि शिल्ड तसेच खुले वयोगटातील मुली
प्रथम क्र.७००१, व्दितीय क्र.५००१, तृतीय क्र. ३००१ आणि शिल्ड प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात ७ आर्कषक आणि भव्य पारितोषिक दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील २५ खेळाडूंना मेडल, प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची, जेवणाची सोय संयोजक करणार आहेत.या बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या स्पर्धेचा स्पर्धकांनी घ्यावा,असे आवाहन श्री.सर्जेराव यादव स्पोर्टस अॅकेडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |