महाबळेश्वर (निलेश बावळेकर) : महाराष्ट्राचे मिनी काश्मिर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंडगार असते. या थंड हवेचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असतात. उन्हाळा सुरु झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. परंतू काल मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. सकाळी पर्यटकांनी वेण्णा लेक परिसरामध्ये झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती.
पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्याने बहरलेले महाबळेश्वर देशभरातील पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन असते. शिमला, कुलू, मनाली यानंतर पर्यटनासाठी पहिले प्राधान्य महाबळेश्वरसाठी असते. पुणे, मुंबई, सुरत ही महानगरे महाबळेश्वरपासून जवळ असल्यामुळे येथील पर्यटक हजारोंच्या संख्येने महाबळेश्वरमध्ये येत असतात. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्र तापला असतानासुद्धा महाबळेश्वर मात्र गारेगार असते. आपल्याकडे होळीनंतर उन्हाचा कडाका वाढतो. पर्यायाने महाबळेश्वरचेही तापमान वाढते. गेल्या पंधरा दिवसांत उन्हाचा पारा चांगलाच चढलेला आहे. परंतू असे असतानाही काल मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. सकाळी येथील वेण्णा लेक परिसरातील अनेक झाडांच्या पानांवर गोठलेले दवबिंदू साचल्याचे स्थानिकांसह पर्यटकांना दिसल्यामुळे पर्यटकही भलतेच खूष झाले. अनेकांनी आपल्याजवळ असणार्या मोबाईलमधून फोटो काढून ऐन उन्हाळ्यात झाडांच्या पानावर गोठलेल्या दवबिंदूंची छायाचित्रे आपल्या मोबाईल कॅमेर्यात बंदिस्त केली. सध्याचे हवामान एकूणच लहरी झाले आहे. महाबळेश्वरमध्ये वातावरणाच्या बाबतीत कधी काही होईल सांगता येवू शकत नाही. मात्र, पहाटे पडलेल्या दवबिंदूंची चर्चा मात्र महाबळेश्वर शहरात आज सकाळपासून सर्वत्र ऐकावयास मिळत होती.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |