पुन्हा भाजपचे सरकार येऊ नये, अन्यथा दोन महिन्यात राज्यातील सर्व आश्रमशाळा बंद पडतील : पद्मश्री माने
सातारा : कोणत्याही परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट येता कामा नये. कारण त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपच्या हातात सत्तेची सूत्रे जातील. त्यामुळे काहीही करून तुम्ही एकत्र या, असे कळकळीचे आवाहन उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला केले. संविधान व लोकशाही वाचवायची असेल, तर संघटित होण्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपला रोखल्याशिवाय संविधान वाचणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकारने आश्रमशाळांना मिळणारे रेशनिंगचे धान्य बंद केले आहे. खुल्या बाजारातून धान्य घेणे आश्रमशाळांना परवडणारे नाही. मग आम्ही मुले जगवायची कशी असा सवाल करून, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येऊ नये. अन्यथा दोन महिन्यात महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळा बंद पडतील अशी भीती माने यांनी यावेळी व्यक्त केली. लिलावात ठेका बोलून धान्य खरेदी करा असे आम्हाला सांगितले जाते. आम्ही संस्था चालवायच्या, पोरं शिकवायची, की ठेका बोलायचा असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.
वंचित आघाडीने आम्ही म्हणत होतो तशी भूमिका घेतली असती, तर आंबेडकरवादी चळवळीचे आज ५ ते ७ खासदार व २५ - ३० आमदार निवडून आले असते आणि आजच्या परिस्थितीत समाज विंâगमेकरच्या भूमिकेत राहिला असता. पण ऐकले न गेल्याने समाज सत्तेच्या परीघाच्या बाहेर राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळेच आपण वंचित आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली आहे. हा पक्ष संविधानाचे रक्षण करण्यास कटिबध्द आहे. नागरिकांचे मूलभुत स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे. सर्व कारभार हुवूâमशाही पध्दतीने सुरू आहे. पत्रकार, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते यांचे फोन टॅप केले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांची , अर्थव्यवस्थेची झालेली वाताहत, मोडून पडलेली तरूणांची मने व रिकामे हात या सर्वांविरूध्द आम्ही लढाई करणार आहोत. हा लढण्याचा निर्धार करण्यासाठी गुरूवारी दुपारी १२ वाजता श्रावस्ती सांस्कृतिक केंद्र (करंजे, सातारा) येथे पक्षाच्या कार्यकत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. बैठकीला राज्याच्या सर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण सर्वांसाठी खुले आहे. पण आमची भूमिका मान्य नसलेल्यांनी बैठकीला येऊ नये, असे माने यांनी म्हटले आहे.
पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला केले. संविधान व लोकशाही वाचवायची असेल, तर संघटित होण्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपला रोखल्याशिवाय संविधान वाचणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.